JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs NZ: दमलेल्या न्यूझीलंडला अक्षरने तंगवले, मुंबई टेस्टवर टीम इंडियाची मजबूत पकड

IND vs NZ: दमलेल्या न्यूझीलंडला अक्षरने तंगवले, मुंबई टेस्टवर टीम इंडियाची मजबूत पकड

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात मुंबईत सुरू असलेल्या टेस्टवर टीम इंडियाची पकड मजबूत झाली आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये आजवर बॉलिंगनं कमाल केलेल्या अक्षर पटेलची (Axar Patel) फटकेबाजी हे दुसऱ्या इनिंगचे वैशिष्ट्य ठरले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 डिसेंबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात मुंबईत सुरू असलेल्या टेस्टवर टीम इंडियानं मजबूत पकड मिळवली आहे. टीम इंडियानं पहिल्या इनिंगमध्ये 263 रनची आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसरी इनिंग 7 आऊट 276 रनवर घोषित केली. टेस्ट क्रिकेटमध्ये आजवर बॉलिंगनं कमाल केलेल्या अक्षर पटेलची (Axar Patel) फटकेबाजी हे टीम इंडियाच्या दुसऱ्या इनिंगचे वैशिष्ट्य ठरले. अक्षर पटेलनं पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतक (52 रन) झळकावले होते.  तो दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटींगला आला तेव्हा टीम इंडियाला झटपट रनची गरज होती. त्याने अगदी टी20 स्टाईलने फटकेबाजी केली. अक्षरने 26 बॉलमध्ये 3 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं नाबाद 41 रन काढले. या खेळीत त्याचा स्ट्राईक रेट 157.69 होता. अक्षरनं सातव्या विकेटसाठी जयंत यादव (Jayant Yadav) सोबत 48 रनची झटपट भागिदारी केली. जयंत आऊट होताच विराट कोहलीनं भारताची दुसरी इनिंग घोषित केली.

संबंधित बातम्या

त्यापूर्वी सकाळी टीम इंडियानं  बिनबाद 69 या स्कोअरवरुन पुढे खेळण्यास सुरूवात केली. मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) या जोडीनं सकाळच्या सेशनमध्ये आत्मविश्वासानं खेळण्यास सुरूवात केली. पहिल्या इनिंगमध्ये शतक झळकावलेल्या मयंकने या इनिंगमध्ये अर्धशतक झळकावले. ओपनिंग जोडीनं पहिल्या विकेट्ससाठी शतकी भागिदारी केली. त्यानंतर एजाजनेच ही जोडी फोडली. त्याने मयंकला 62 रनवर आऊट केले. त्यापाठोपाठ एजाझनेच पुजाराचीही विकेट घेतली. पुजाराचं अर्धशतक 3 रननं हुकलं. मयांक-पुजारा आऊट झाल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांची जोडी जमली. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 82 रनची भागिदारी केली. शुभमनला पुन्हा एकदा अर्धशतक झळकवण्यात अपयश आले. तो 47 रन काढून आऊट झाला. गिलने पहिल्या इनिंगमध्ये 44 रन काढले होते. विराट कोहली मैदानात सेट झाल्यानं मोठी खेळी करेल असा अंदाज होता. पण, तो 36 रन काढून आऊट झाला. पाकिस्तान दौऱ्यातून पोलार्डची माघार, ‘हे’ 2 जण असणार वेस्ट इंडिजचे कॅप्टन न्यूझीलंडकडून एजाझ पटेल (Ajaz Patel) सर्वात यशस्वी बॉलर ठरला.  पहिल्या इनिंगमध्ये सर्व 10 विकेट्स घेणाऱ्या एजाझनं दुसऱ्या इनिंगमध्ये 4 विकेट्स घेतल्या. तर रचिन रविंद्रला 3 विकेट्स मिळाल्या. न्यूझीलंडच्या अन्य बॉलर्सना संपूर्ण टेस्टमध्ये एकही विकेट मिळाली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या