मुंबई, 14 मार्च : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 टी20 मॅचच्या मालिकेनंतर (Ind vs England T20 Series) दोन्ही देशांमध्ये तीन मॅचची वन-डे मालिका (ODI Series) होणार आहे. या मालिकेची सुरुवात 23 मार्च रोजी होईल. यासाठी भारतीय टीमची निवड रविवारी होणार आहे. या मालिकेत भारताचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि व्हाईस कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) हे दोघंही खेळणार आहेत. यापूर्वी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या क्रिकेटमुळे रोहित शर्मा आणि अन्य काही खेळाडूंना या मालिकेमध्ये आराम दिला जाऊ शकतो, अशी बातमी आली होती. मात्र, कोणत्याही वरिष्ठ खेळाडूने बीसीसीआय (BCCI) कडे विश्रांतीची विनंती केलेली नाही, अशी माहिती आहे. बीसीसीआयच्या सुत्रांनी ‘पीटीआय’ ला दिलेल्या माहितीनुसार, ‘रविवारी वन-डे मालिकेसाठी भारतीय टीमची निवड होण्याची शक्यता आहे. या मालिकेसाठी विराट कोहली. रोहित शर्मा यापैकी कुणीही विश्रांती देण्याची मागणी केलेली नाही. या टीममध्ये मोठे बदल किंवा नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. टीममध्ये वरिष्ठ खेळाडू खेळणार असतील, तर पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल या युवा खेळाडूंना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.’ शॉ आणि पडिक्कल फॉर्मात पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल हे दोघेही सध्या फॉर्मात आहे. या दोघांनीही विजय हजारे ट्रॉफीमध्ये चांगलं प्रदर्शन केलं आहे. या स्पर्धेत सर्वाधिक रन बनवणाऱ्या पहिल्या दोन बॅट्समनमध्ये त्यांचा समावेश आहे. देवदत्त पडिकक्लने कर्नाटकसाठी 7 मॅचमध्ये 737 रन केले. त्यामध्ये 4 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. पडिक्कलनं या स्पर्धेतील प्रत्येक मॅचमध्ये 50 पेक्षा जास्त रन केले. ( धोनीने का केलाय असा अवतार? माहीचा बौद्ध भिख्खूच्या लुकमधील फोटो Vira l ) तर मुंबईच्या पृथ्वी शॉ ने फायनलपूर्वीच्या आकडेवारीनुसार 7 मॅचमध्ये तब्बल 188 च्या सरासरीने 754 रन काढले आहेत. त्याने या स्पर्धेत एक द्विशतक आणि तीन शतक झळकावली आहेत.