चेन्नई, 16 फेब्रुवारी : भारतानं इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये (IND vs ENG) जबरदस्त पुनरागमन केलं आहे. पहिल्या टेस्टमध्ये भारताचा 227 रननं पराभव केला. दुसऱ्या टेस्टमध्ये भारतानं इंग्लंडचा 317 रननं पराभव करत मागील पराभवाची परतफेड केली आहे. भारतानं दिलेलं 482 रनचं आव्हान इंग्लंडला पेलवलं नाही. त्यांची संपूर्ण टीम फक्त 164 रनवर आटोपली. भारताला आणखी एक फायदा भारताचा इंग्लंड विरुद्धचा हा सर्वात मोठा विजय आहे. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाला (Team India) आणखी एक फायदा झाला आहे. ICC च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (WTC) रँकिंगमध्ये भारतानं आता दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. या विजयानंतर भारताचे 69.7 परसेंटेज पॉईंट्स (PTC) झाले आहेत. न्यूझीलंडची टीम या चॅम्पियनशीपमध्ये आघाडीवर असून न्यूझीलंडचे 70 पॉईंट्स आहेत. इंग्लंडची टीम या पराभवानंतर चौथ्या क्रमांकावर घसरली आहे.
लॉर्ड्समध्ये जून महिन्यात होणारी फायनल खेळण्यासाठी भारत आणि इंग्लंड या दोन्ही टीमसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. ही फायनल गाठण्यासाठी चार टेस्टच्या या मालिकेतील किमान 2 टेस्ट भारताला जिंकणे आवश्यक आहे. तर इंग्लंडला किमान 3 टेस्ट जिंकणे आवश्यक आहे. ( वाचा : IND vs ENG : टीम इंडियाचा दुसऱ्या टेस्टमध्ये दणदणीत विजय, मालिकेत बरोबरी ) पुढील समीकरण काय? सध्या दोन्ही टीमनं एक-एक टेस्ट जिंकली आहे. त्यामुळे आता अहमदाबादमध्ये होणाऱ्या शेवटच्या दोन टेस्टपैकी एका टेस्टमध्ये विजय आणि उरलेली एक टेस्ट ड्रॉ जरी झाली तरी भारताची टीम न्यूझीलंड विरुद्ध लॉर्डसमध्ये होणारी फायनल खेळू शकेल. इंग्लंडची वाट या पराभवानं आणखी खडतर झाली आहे. आता इंग्लंडला फायनल गाठण्यासाठी उरलेल्या दोन्ही टेस्ट जिंकणे आवश्यक आहे. ही मालिका जर बरोबरीत सुटली तर भारत आणि इंग्लंड या दोन्ही टीमना मागं टाकून ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे ऑस्ट्रेलियन टीमचंही या मालिकेच्या निकालाकडं लक्ष लागलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी टेस्ट 24 फेब्रुवारीपासून अहमदाबादमध्ये सुरू होणार असून ही डे-नाईट टेस्ट असेल. तर चौथी आणि शेवटची टेस्ट अहमदाबादमध्येच 4 मार्चपासून सुरू होणार आहे.