JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Mankading च्या नियमातील बदलावर इंग्लंडचा खेळाडू नाराज, म्हणाला...

Mankading च्या नियमातील बदलावर इंग्लंडचा खेळाडू नाराज, म्हणाला...

मेरिलबोन क्रिकेट क्लब (Melbourne Cricket Club) या क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या संस्थेनं नवे नियम तयार केले आहेत. त्या नियमावर क्रिकेट विश्वात वेगवेगळी मतं व्यक्त होत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 मार्च : मेरिलबोन क्रिकेट क्लब (Melbourne Cricket Club) या क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या संस्थेनं नवे नियम तयार केले आहेत. या नियमामुसार एखाद्या बॅटरला मंकडिंग पद्धतीनं आऊट करणे हे खेळ भावनेच्या विरोधात मानले जाणार नाही. 1 ऑक्टोबर 2022 पासून या नियमाची अमंलबजावणी होणार आहे. एमसीसीनं नवे नियम जाहीर करताच या विषयावर क्रिकेट विश्वात चर्चा सुरू झाली आहे. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) या टीम इंडियाच्या माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तर इंग्लंडचा फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉडनं (Stuart Broad) या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. ब्रॉडनं ट्विट करत या विषयावर नाराजी व्यक्त केली आहे. मंकडिंग आऊट करण्यात कोणत्याही कौशल्याची गरज नसते, असं मत ब्रॉडनं व्यक्त केलं आहे. ‘आता मंकडिंग पद्धतीनं आऊट करणे अयोग्य नाही. हा आता कायदेशीर मार्ग बनला आहे. आऊट करण्याचा हा वैध मार्ग नव्हता. माझ्या मते हा चुकीचा निर्णय आहे. मी याला योग्य मानत नाही. बॅटर्सना आऊट करण्यासाठी कौशल्याची गरज असते आणि मंकडिंग करण्यासाठी कोणत्याही कौशल्याची गरज नाही,’ असे ट्विट ब्रॉडनं केले आहे.

संबंधित बातम्या

ब्रॉडनं नाराजी व्यक्त केली असली तरी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ‘मी या निर्णयानं आनंदी आहे. माझ्यामते पहिल्यापासून रन आऊटचा नियम हवा होताा. ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. यापूर्वी मला या पद्धतीचा संकोच वाटत असे, आता तसं होणार नाही.’ असे सचिनने सांगितले. IND vs NZ : टीम इंडियाला दमदार फिल्डिंगमुळे मिळालं पहिलं यश, न्यूझीलंडची खराब सुरूवात VIDEO आयपीएल 2019 मध्ये तेव्हा पंजाबच्या टीमकडून खेळणारा टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर. अश्विननं (R. Ashwin) या पद्धतीनं जोस बटलरला आऊट केलं होतं, त्यावेळी मोठा वाद झाला होता. आगामी आयपीएलमध्ये हे दोघंही राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या एकाच आयपीएल टीमकडून खेळणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या