JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs NZ, Dream 11 Prediction: 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य

IND vs NZ, Dream 11 Prediction: 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य

या मॅचमध्ये टीम इंडियाला (Team India) काही बदल आणि प्रयोग करण्याची संधी आहे. तर न्यूझीलंडला (New Zealand) व्हाईट वॉशची नामुष्की टाळण्यासाठी ही मॅच जिंकणे आवश्यक आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोलकाता, 21 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील तिसरा टी20 सामना कोलकातामध्ये रविवारी होणार आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पराभवामुळेच टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये प्रवेश करता आला नव्हता. त्यानंतर लगेच सुरू झालेल्या या मालिकेतील पहिले दोन सामने टीम इंडियानं एकतर्फी जिंकले आहेत. मालिका जिंकल्यानंतर आता ‘क्लीन स्वीप’ वर नवा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि हेड कोच राहुल द्रविडची (Rahul Dravid) नजर असेल. या मॅचमध्ये टीम इंडियाला काही बदल आणि प्रयोग करण्याची संधी आहे. तर न्यूझीलंडला व्हाईट वॉशची नामुष्की टाळण्यासाठी ही मॅच जिंकणे आवश्यक आहे. टीम इंडियानं कोलकाताच्या इडन गार्डनवर आजवर चार टी20 सामने खेळले आहेत. यापाैकी दोन सामने जिंकले आहेत. या मैदानात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2019 साली झाला होता. ड्यू फॅक्टरमुळे हे पिच बॅटींगसाठी अनुकूल असेल. त्यामुळे टॉसचा निर्णय महत्त्वाचा ठरेल. चार दिवसानंतर लगेच भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टेस्ट सीरिज सुरू होत आहे. त्यामुळे अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. अनुभवी आर. अश्विनच्या जागी युजवेंद्र चहल या सामन्यात खेळू शकतो. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपासून सतत खेळणाऱ्या ऋषभ पंतला या मॅचमध्ये ब्रेक दिला जाऊ शकतो. पंतच्या जागेवर खेळण्यासाठी इशान किशन हा पर्याय टीम इंडियाकडं आहे. IND vs NZ Dream 11 Team Prediction विकेट किपर - टीम सिफर्ट बॅटर्स - केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, मार्टीन गप्टील, मार्क चॅम्पमेन ऑल राऊंडर्स - मिचेल स्टँनर, डॅरेल मिचेल बॉलर्स - हर्षल पटेल, आर. अश्विन, ट्रेन्ट बोल्ट IND vs NZ 3rd T20 LIVE Streaming: तिसरी T20 कधी आणि कुठे पाहता येणार? टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, आर.अश्विन, युझवेंद्र चहल, दीपक चहर, आवेश खान, मोहम्मद सिराज, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल आणि हर्षल पटेल न्यूझीलंड:  टीम साऊदी (कॅप्टन), ट्रेन्ट बोल्ट, मार्टीन गप्टील, डॅरेल मिचेल, टीम सिफर्ट, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, रचिन रविंद्र, मिचेल स्टँनर, लॉकी फर्ग्युसन, अ‍ॅडम मिल्ने, मार्क चॅपमन, आणि इश सोधी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या