JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / मोठी बातमी : टीम इंडियाला हरवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर कट! शास्त्रींच्या सुचनेकडंही दुर्लक्ष

मोठी बातमी : टीम इंडियाला हरवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर कट! शास्त्रींच्या सुचनेकडंही दुर्लक्ष

भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात गेल्या वर्षी चेन्नईमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 227 रननं पराभव झाला होता. टीम इंडियानं चेन्नई टेस्टमध्ये पराभूत व्हावं, यासाठी कट रचण्यात आला होता, असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 मार्च : भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात गेल्या वर्षी चेन्नईमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 227 रननं पराभव झाला होता. टीम इंडियानं चेन्नई टेस्टमध्ये पराभूत व्हावं, यासाठी कट रचण्यात आला होता, असा दावा एका मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. या टेस्टच्या आदल्या दिवशी तत्कालिन हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि बॉलिंग कोच भरत अरूण (Bharat Arun) यांनी सूचना दिल्यानंतरही पिचचं स्वरूप बदलण्यात आले. त्याचा परिणाम टीम इंडियाच्या कामगिरीवर झाला, असा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. चेन्नई टेस्टच्या आदल्या दिवशी ग्राऊंडवर उपस्थित असलेल्या एका सूत्रांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ शी बोलताना हा धक्कादायक खुलासा केला आहे. ‘रवी शास्त्री आणि भरत अरूण टेस्ट सुरू होण्याच्या आदल्या दिवशी 4 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी चेन्नईतील चिदंबरम स्टेडिअमवर (MA Chidambram Stadium) उपस्थित होते. त्यांनी क्युरेटर आणि ग्राऊंड्समनला पिचमध्ये कोणताही बदल करू नये. ते आहे, तसंच ठेवावं अशी सूचना केली आणि ते तिथून निघून गेले.’ शास्त्री आणि अरूण गेल्यानंतर एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं क्यूरेटर आणि ग्राऊंडसमनला पिचवर पाणी टाकण्याचा तसंच त्यावर रोलर फिरवण्याचा आदेश दिला. त्यांनी कोणताही प्रश्न न विचारता या आदेशाची अंमलबजावणी केली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी ते पिच ‘पाटा’ झाले. कुणी केला फोन? पिचचं बदललेलं स्वरूप पाहून टीम मॅनेजमेंट नाराज झाले होते. BCCI नं या प्रकरणाची चौकशी केली तर आम्ही सहकार्य करण्यासाठी तयार आहोत, असे या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. ग्राऊंडसमन आणि क्युरेटर यांना फोन करणारा वरिष्ठ अधिकारी कोण आहे? हे उघड व्हायला हवं, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. IND vs SL : श्रीलंकेला हरवल्यानंतर रोहित शर्मा घेणार ‘ही’ जबाबदारी, कॅप्टननं केला खुलासा चेन्नईमध्ये झालेल्या त्या टेस्टमध्ये इंग्लंडनं पहिल्यांदा बॅटींग करत कॅप्टन जो रूटच्या (Joe Root) 218 रनच्या जोरावर पहिल्या इनिंगमध्ये 578 रनचा विशाल स्कोअर केला. त्याला उत्तर देताना टीम इंडियाची पहिली इनिंग 337 रनवर संपुष्टात आली. इंग्लंडनं दुसऱ्या इनिंगमध्ये 178 रन करत भारतासमोर 420 रनचं अवघड टार्गेट ठेवलं होतं. या टार्गेटचा टीम इंडियाची दुसरी इनिंग 178 रनरवरच संपुष्टात आली. या टेस्टमधील पराभवानंतर टीम मॅनेजमेंटनं क्युरेटर बदलण्याची मागणी बीसीसीआयकडं केली होती. त्यानंतर चेन्नईत झालेल्या पुढील टेस्टमध्ये एका सिनिअर क्युरेटरची नियुक्ती करण्यात आली. मात्र पहिल्या टेस्टपूर्वी क्युरेटरनं पिच का बदललं? याची चौकशी करण्याची मागणी आता होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या