मुंबई, 20 एप्रिल : बांगलादेश क्रिकेटसाठी (Bangladesh Cricket) मंगळवारचा दिवस (19 एप्रिल) चांगलाच दुर्दैवी ठरला. या एकाच दिवशी त्यांनी 2 क्रिकेटपटू गमावले. बांगलादेशकडून पहिली वन-डे खेळणाऱ्या टीमचे सदस्य समीउर रहमान (Samiur Rahman) आणि माजी लेफ्ट आर्म स्पिनर मुशर्रफ हुसेन (Musharraf Hossain) या दोघांचं एकाच दिवशी निधन झाले आहे. या दोघांचेही ब्रेन ट्यूमरनं निधन झालं आहे. 69 वर्षांच्या समीउर यांची गेल्या काही दिवसांपासून तब्येत बिघडली होती. त्यांना ढाक्यातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांनी बांगलादेशचं फक्त 2 वन-डेमध्ये प्रतिनिधित्व केलं. तरीही 1986 साली झालेल्या आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान विरूद्ध बांगलादेशची पहिली वन-डे खेळणाऱ्या टीमचे महत्त्वाचे सदस्य अशी त्यांची ओळख होती. समीउर यांनी नंतर अंपायर म्हणून देखील काम केलं.
40 वर्षांच्या मुशर्रफ यांनाही गेल्या 3 वर्षांपासून ब्रेन ट्यूमरचा साथ होता. त्यांच्यावर सिंगापूर आणि भारतामध्येही उपचार झाले होते. त्यांनी बांगलादेशकडून पाच आंतरराष्ट्रीय वन-डे खेळल्या, पण देशांतर्गत क्रिकेटमधील ते अनुभवी खेळाडू होते. त्यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये 572 विकेट्स घेतल्या होत्या. आयुष्याची लढाई लढतोय ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू, ICU मध्ये ऍडमिट एकाच दिवशी दोन क्रिकेटपटूंचं निधन झाल्यानं बांगलादेश क्रिकेट बोर्डासह (Bangladesh Cricket Board) क्रिकेट विश्वालाही धक्का बसलाय. बांगलादेश बोर्डाच्या वतीनं नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेच्यापूर्वी या दोन्ही खेळाडूंना श्रद्धांजली देण्यात आली.