JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / कोहली-रहाणेला जमत नाही ते बांगलादेशनं करून दाखवलं! टीम इंडियाची प्रतीक्षा कायम

कोहली-रहाणेला जमत नाही ते बांगलादेशनं करून दाखवलं! टीम इंडियाची प्रतीक्षा कायम

बांगलादेश क्रिकेट टीमनं (Bangladesh Cricket Team) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. टेस्ट क्रिकेटमधील चॅम्पियन असलेल्या न्यूझीलंडला बांगलादेशनं धक्का दिला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 जानेवारी :  बांगलादेश क्रिकेट टीमनं (Bangladesh Cricket Team) ऐतिहासिक कामगिरी केली आहे.  बांगलादेशनं न्यूझीलंडचा 8 विकेट्सनं पराभव केला आहे. टेस्ट क्रिकेटमधील चॅम्पियन असलेल्या न्यूझीलंडला बांगलादेशनं धक्का दिल्यानं क्रिकेट इतिहासातील एका खळबळजनक विजयाची नोंद झाली आहे.  बांगलादेश सारख्या विजयाची टीम इंडियाला गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा आहे. न्यूझीलंडची टीम 5 वर्ष आणि 17 टेस्टनंतर पहिल्यांदाच घरच्या मैदानावर एखादी टेस्ट हरली आहे. इतकंच नाही तर बांगलादेशचा हा न्यूझीलंडच्या जमिनीवर कोणत्याही प्रकारातील हा पहिलाच विजय आहे.इबादत हुसेन (Ebadot Hossain) हा बांगलादेशच्या या ऐतिहासिक विजयाचा हिरो ठरला. त्याने दुसऱ्या इनिंदमध्ये 6 विकेट्स घेतल्या. पहिल्या टेस्टच्या शेवटच्या दिवशी न्यूझीलंडची टीम 169 रनवर संपुष्टात आली. बांगलादेशनं विजयासाठी आवश्यक असलेले 40 रन 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. बांगलादेशनं न्यूझीलंडवर विजय मिळवला. पण टीम इंडिया गेल्या 13 वर्षांपासून या प्रकारच्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. टीम इंडियानं न्यूझीलंडमध्ये शेवटची टेस्ट 2009 साली जिंकली होती. सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियातील इशांत शर्मा (Ishant Sharma) या एकमेव खेळाडूला न्यूझीलंडमध्ये टेस्ट जिंकण्याचा अनुभव आहे. टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीसह (Virat Kohli) चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, रोहित शर्मा, केएल राहुल या सर्व खेळाडूंना न्यूझीलंडमधील टेस्ट विजयाची प्रतीक्षा आहे. शार्दुल ठाकूर ठरला टीम इंडियासाठी नायक, पण ‘या’ खेळाडूसाठी खलनायक टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये शेवटची टेस्ट जिंकली तेव्हा महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) टीमचा कॅप्टन होता. सचिन तेंडुलकरनं त्या टेस्टमध्ये 160 रनची अविस्मरणीय खेळी खेळली होती. त्यामुळे भारतीय टीमनं पहिल्या इनिंगमध्ये 520 रनचा विशाल स्कोअर केला होता. न्यूझीलंडनं त्याला उत्तर देताना दोन्ही इनिंगमध्ये 279-279 रन केले. त्यानंतर टीम इंडियाने 39 रनचे टार्गेट एकही विकेट न गमावता पूर्ण केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या