मुंबई, 11 एप्रिल : क्रिकेट विश्वात सर्वत्र आयपीएल स्पर्धेची (IPL 2022) धूम सुरू असताना पोर्ट एलिजाबेथमध्ये दक्षिण आफ्रिका विरूद्ध बांगलादेश (South Africa vs Bangladesh) टेस्ट मॅच सुरू आहे. या मॅचचा रविवारी तिसरा दिवस होता. यजमान दक्षिण आफ्रिकेनं ही टेस्ट जिंकण्यासाठी बांगलादेशला 413 रनचं टार्गेट दिलं आहे. या टार्गेटचा पाठलाग करता बांगलादेशची अवस्था तिसऱ्या दिवसाच्याअखेरीसस 3 आऊट 27 अशी नाजूक झाली आहे. रविवारी ही टेस्ट सुरू असताना एक भयंकर दुर्घटना मैदानात घडली. दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या इनिंगमधील पहिल्याच ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. बांगलादेशचा फास्ट बॉलर इबादत हुसेन याने टाकलेला बॉलवर आफ्रिकेचा ओपनर सेरेल इर्वीनं कट लगावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पॉईंट उभ्या असलेल्या मेहंदी हसन मिराजला (Mehidy Hasan Miraz) कॅच घेण्याची सोपी संधी होती. मेहंदी हसनचं त्या बॉलकडे लक्षच नव्हतं. त्याला तो बॉल दुसरीकडं जात आहे, असं वाटलं. प्रत्यक्षात तो त्याच्या अवघड जागेवर आदळला. इर्वीनं जोरात मारलेला कट शॉट अवघड जागी आदळल्यानं मेहदी हसन लगेच खाली पडला. त्याला चांगलाच त्रास होत होता. हा प्रकार पाहून फिजियोनं मैदानात धाव घेतली. त्यांनी हसनची अवस्था पाहून मैदानात स्ट्रेचर बोलावले.
सुदैवानं हसनची जखम फार गंभीर नव्हती. तो काही वेळानं पुन्हा फिल्डिंगसाठी परतला. त्यानं 9.5 ओव्हर्समध्ये 34 रन देत 2 विकेट्सही घेतल्या. पोर्ट एलिजाबेथ टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेनं 453 रन केले होते. त्याला उत्तर देताना बांगलादेशची पहिला इनिंग 217 रनवर संपुष्टात आली. IPL 2022 : सुपर संडेला ‘कुलचा’ चा धमाका, वर्ल्ड कप खेळणारा बॉलर पडला मागं दक्षिण आफ्रिकेनं दुसरी इनिंग 6 आऊट 176 रनवर घोषित करत बांगलादेशला मॅच जिंकण्यासाठी 413 रनचं टार्गेट दिलं आहे. त्याचा पाठलाग करताना बांगलादेशची अवस्था नाजूक झालीय. आता ही टेस्ट जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील दुसरा क्रमांक आणखी भक्कम करण्याची संधी आफ्रिकेला आहे.