JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2020 ला कोरोनाची लागण? IPL रद्द करण्यासाठी मद्रास हायकोर्टात याचिका

IPL 2020 ला कोरोनाची लागण? IPL रद्द करण्यासाठी मद्रास हायकोर्टात याचिका

कोरोना व्हायरसमुळे IPL ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहे की नाही यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. महाराष्ट्र सरकारही IPL च्या आयोजनाबद्दल मोठा निर्णय घेणार आहे.

जाहिरात

मात्र आता यंदा ही स्पर्धा होणार असल्याचं निश्चित झालं आहे. यंदाची आयपीएल स्पर्धा 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 मार्च - कोरोना व्हायरसमुळे (corona virus) सध्या जगभरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. IPL 2020 सुद्धा कोरोना व्हायरसमुळे सध्या संकटात सापडलं आहे. कारण IPL 2020 ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार की नाही यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. कारण IPL वर बंदी घालण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारीच IPL 2020 चे सामने पुढे ढकलण्याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ असं म्हटलं होतं. आता याच पार्श्वभूमीवर मद्रास हायकोर्टातसुद्धा याचिका दाखल करण्यात आली आहे. मद्रास हायकोर्टातले वकील जी. अॅलेक्स बेनझिगर यांनी याबाबत याचिका दाखल केली आहे. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 12 मार्च रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. दाखल केलेल्या याचिकेत काय? WHO ने सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत कोरोना व्हायरससाठी (corona virus) कुठलीही विशिष्ट अशी औषधोपचार पद्धती उपलब्ध नाही. दुसरीकडे कोरोना व्हायरस सध्या जगाच्या पाठीवर देशातही मोठ्या प्रमाणात पसरत आहे. त्यामुळे हे एक मोठं संकट म्हणून समोर येत आहे.  कोरोना एक साथीच्या रूपात उभं राहिलं आहे. वाचा - Corona इफेक्ट : IPL बाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय? सध्या भारतात कुठल्याही मोठ्या क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्याबाबत अजून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी ही बाब हायकोर्टाच्या नजरेत आणली आहे. कधी होणार IPL सामने? येत्या 29 मार्च ते 24 मे पर्यंत यावर्षी IPL रंगणार आहे. यंदाच्या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये रंगणार आहे. त्यामुळे IPL 2020 च्या चाहत्यांमध्ये सामन्याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे. त्यातच आता कोरोना व्हायरसचं (corona virus) मोठं संकट उभं राहिल्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजी सुद्धा काही प्रमाणात व्यक्त केली जात आहे.   वाचा- INDL vs SLL : मुंबईकर हैराण, मास्टर ब्लास्टर सचिन शून्यावर बाद दरम्यान, BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी IPL 2020 रद्द करणे किंवा पुढे ढकलण्यात यावे याबाबत कुठलाही निर्णय सध्यातरी झालेला नाही असं यापूर्वीच सांगितलं आहे. पण IPL च्या काळात कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात येईल असं त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं. ‘‘IPL 2020 सामन्यांच्या वेळी आम्ही सर्व प्रकारच्या सुरक्षाव्यवस्थेची काळजी घेऊ. आमची मेडिकल टीम यासाठी सज्ज आहे. जे आमची मेडिकल टीम सांगेल त्यानुसार आम्ही योग्य ती काळजी घेऊ,’’ असं BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता मद्रास हायकोर्टाच्या याचिकेवर काय निर्णय येईल यावर IPL चं भवितव्य अवलंबून आहे. वाचा - Coronavirus आधी ‘या’ महाभयंकर आजारांमुळेही जगभरात लागू झाली होती हेल्थ एमर्जन्सी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या