नीतू घंघास
बर्मिंगहॅम, 07 ऑगस्ट: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची बॉक्सर नीतू घंघासनं बॉक्सिंगमध्ये भारताला पहिलं पदक मिळवून दिलंय. नीतूनं 48 किलो या वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. नीतूनं अंतिम सामन्यात ब्रिटनच्या बॉक्सरचा 5-0 असा पराभव करुन सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. दोन वेळा जागतिक युवा बॉक्सिंगची विजेती ठरलेल्या नीतूनं काल उपांत्य फेरीच्या लढतीत कॅनडाच्या प्रियंका धिल्लनचा पराभव करुन भारताचं पदक पक्क केलं होतं. त्यानंतर आज तिनं भारतासाठी यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतलं 14वं पदक जिंकून दिलं.