JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी भारतीयच; BCCI ने दिली माहिती!

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी भारतीयच; BCCI ने दिली माहिती!

गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री(coach ravi shastri) शास्त्रींनंतर या पदाची जबाबदारी कोण घेणार, याबाबत चर्चा रंगली आहे. या पदासाठी अनेक भारतीय दिग्गजांसह परदेशी दिग्गजांचीही नावे समोर आली आहेत. पण…

जाहिरात

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी भारतीयच; BCCI ने दिली माहिती!

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर: टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री(coach ravi shastri) यांचा कार्यकाळ यावर्षी टी -20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup ) संपणार आहे. टी 20 वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षकपद सोडतील. गेल्या काही दिवसांपासून शास्त्रींनंतर या पदाची जबाबदारी कोण घेणार, याबाबत चर्चा रंगली आहे. या पदासाठी अनेक भारतीय दिग्गजांसह परदेशी दिग्गजांचीही नावे समोर आली आहेत. पण, टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी भारतीयच व्यक्ती असणार आहे. अशी माहिती समोर आली आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, टीम इंडियाचा शास्त्रीनंतरचा नवा मुख्य प्रशिक्षक हा भारतीयच असणार आहे. या गोष्टीची दखल बीसीसीआयने घेतली असून त्यांच्या सुत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआय टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जागा परदेशी प्रशिक्षकाला देण्यास इच्छुक नाही. तसेच, नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड मालिकेपूर्वी आमच्याकडे नवीन प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी असतील. असेही बीसीसीआयने म्हटले आहे. हे वाचा- ‘…मी त्याचा आदर करत नाही’, आपल्याच माजी खेळाडूवर भडकला Chris Gayle टीम इंडियाचे पहिले 4 प्रशिक्षक परदेशी होते. जॉन राइट, ग्रेग चॅपेल, गॅरी कर्स्टन आणि डंकन फ्लेचर यांच्या नावांचा यात समावेश आहे. चॅपल यांच्या दोन वर्षांच्या यापैकी सर्वात कठीण टप्पा भारतीय क्रिकेटने पाहिला आहे. त्याचवेळी, गॅरी कर्स्टनच्या प्रशिक्षणाखाली, कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या संघाने 2011 च्या विश्वचषकावर आपले नाव कोरले होते.

कुंबळे परतणार नाही

अनिल कुंबळे 2016-17 मध्ये टीम इंडियाचे प्रशिक्षक होते. विराट कोहलीसोबतच्या वादानंतर रवी शास्त्री यांना जबाबदारी देण्यात आली. अशा स्थितीत कुंबळे पुन्हा प्रशिक्षक म्हणून परतणार नाही. आमची मुख्या खेळाडूंशी चर्चा झाली आहे.

कोचपदासाठी यांची नावं चर्चेत

टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. बीसीसीआयचे काही सदस्य अनिल कुंबळे यांच्या संपर्कात होते. त्यांनी पुन्हा भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज करावा, अशी त्यांची इच्छा होती. तर दुसरीकडे या पदासाठी राहुल द्रविड याचं नावंही चर्चेत आहे. मात्र राहुल द्रविड हे पद सांभाळण्यासाठी इच्छुक नसल्याचं समोर आले आहे. यानंतर, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग आणि झहीर खान हे 3 मोठे दावेदार असू शकतात. तिघांनाही आयपीएलमध्ये प्रशिक्षणाचा अनुभव आहे. या सगळ्याशिवाय बीसीसीआय एनसीएचे संचालक राहुल द्रविडच्या संपर्कात आहे. जुलैमध्ये, जेव्हा टीम इंडिया इंग्लंड आणि श्रीलंकेत एकत्र खेळत होती, द्रविड श्रीलंका संघाचे प्रशिक्षक म्हणून गेले होते. रवी शास्त्रींचा कार्यकाळ संपल्यावर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांचा कार्यकाळही संपणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या