JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / BCCI Central Contracts : हार्दिकसह पुजारा रहाणेला धक्का, बीसीसीआयने केलं डिमोशन

BCCI Central Contracts : हार्दिकसह पुजारा रहाणेला धक्का, बीसीसीआयने केलं डिमोशन

बीसीसीआयने (BCCI) 2021-22 साठी करारबद्ध करण्यात येणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. बीसीसीआयने हार्दिक पांड्यासह (Hardik Pandya) चार खेळाडूंना धक्का दिला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 मार्च : बीसीसीआयने (BCCI) 2021-22 साठी करारबद्ध करण्यात येणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. बीसीसीआयने हार्दिक पांड्यासह (Hardik Pandya) चार खेळाडूंना धक्का दिला आहे. मागच्या काही काळापासून खराब कामगिरी करणाऱ्या अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजाराची (Cheteshwar Pujara) श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियात निवड झाली नव्हती. याशिवाय ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) यालाही टीममधून डच्चू देण्यात आला. या चारही खेळाडूंचं बीसीसीआयने डिमोशन केलं आहे. हार्दिक पांड्या टी-20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियातून बाहेर गेला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना ग्रेड बी मध्ये टाकण्यात आलं आहे, हे दोन्ही खेळाडू आधी ग्रेड ए मध्ये होते. तर हार्दिक पांड्याच्या ग्रेडमध्ये मोठी घसरण झाली आहे. ग्रेड ए मधून हार्दिक थेट ग्रेड सी मध्ये गेला आहे. विकेट कीपर बॅटर ऋद्धीमान साहादेखील ग्रेड बी मधून ग्रेड सीमध्ये गेला आहे. काही दिवसांपूर्वी कोच राहुल द्रविडने आपल्याला संन्यास घ्यायला सांगितला होता, असा दावा साहाने केला होता. करारामध्ये चार ग्रेड बीसीसीआयने करारबद्ध खेळाडूंची चार ग्रेडमध्ये विभागणी केली आहे. A+ मध्ये असलेल्या खेळाडूंना 7 कोटी, तर A ग्रेडमध्ये 5 कोटी, B ग्रेडमध्ये 3 कोटी आणि C ग्रेडमध्ये 1 कोटी रुपये दिले जातात. मागच्या मोसमात एकूण 28 खेळाडूंसोबत करार झाला होता, पण यावेळी मात्र खेळाडूंची संख्या वाढण्याची शक्यता आहे. डावखुरा स्पिनर कुलदीप यादव मागच्यावेळी सी ग्रेडमध्ये होता, पण यंदा त्याला बाहेर ठेवलं जाईल, असं बोललं जातंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या