सिडनी, 13 मार्च : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड (AUS vs NZ) यांच्यात आज पहिला एकदिवसीय सामना (AUS vs NZ 1st ODI) होत आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यासह प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 259 धावांचे आव्हान न्यूझीलंडसमोर ठेवले आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर वॉर्नर आणि फिंच यांनी चांगली सुरुवात केली. 20 ओव्हरमध्येच त्यांनी 100 धावांची भागीदारी केली. मात्र या सामन्यात एक असा प्रकार घडला, ज्यामुळे सर्वच हैराण झाले. या सामन्यात अॅरॉन फिंच बाद झाल्यानंतरही तो मैदानावर खेळत राहिला. तर, न्यूझीलंडचा जलद गोलंदाज ट्रेंट बोल्ट (Trent Boult) अपील करत राहिला. मात्र पंचांनी फलंदाजाचा बाद घोषित केले नाही. वाचा- थाला इज बॅक! IPLआधी धोनीची 123 धावांच्या तुफानी खेळी, पाहा VIDEO ट्रेंट बोल्ट अॅरॉन फिंच गोलंदाजी करत असताना हा प्रकार घजला. यावेळी फिंच मोठा शॉट खेळायला गेला, मात्र चेंडू थेट कीपरच्या हातात गेला. जेव्हा चेंडू फिंचच्या बॅटला लागून गेला, तेव्हा न्यूझीलंडच्या खेळाडूंनी बॅटचा आवाज ऐकला. यानंतर त्यांनी जोरदार अपीलही केले मात्र पंचांनी फलंदाजाला बाद घोषित केले नाही. सामन्याच्या सुरूवातीला कर्णधार केन विल्यमसनने डीआरएस घेणे योग्य वाटले नाही. त्यामुळे फिंच नाबाद राहिला. त्यानंतर फिंचने तुफान फलंदाजी केली. वाचा- आज वर्ल्ड कपमध्ये होणार भारत-पाक महामुकाबला, येथे पाहा सामना LIVE
वाचा- IPLमध्ये कोहलीच्या संघात खेळणाऱ्या क्रिकेटपटूला कोरोनाची लागण फिंचने या सामन्यात 75 चेंडूत 60 धावांची खेळी केली. तर पहिल्या विकेटसाठी वॉर्नरसोबत 124 धावांची भागीदारी केली. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाने 258 धावांपर्य़ंत मजल मारली. यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौरा दक्षिण आफ्रिकेत होता. जिथे त्याने टी -20 मालिका 3-0 ने जिंकली आणि वनडे मालिका 3-0 ने गमावली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने जबरदस्त कामगिरी केली. त्यामुळे घरच्या मैदानावरील या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ पुन्हा कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे.