मुंबई, 11 मार्च : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे (Assembly Elections 2022) निकाल जाहीर झाले आहेत. पंजाबमध्ये (Punjab) आम आदमी पक्षानं (Aam Adami Party) स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. आम आदमी पक्षानं राज्यातील 117 पैकी 92 जागा जिंकल्या. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या पक्षानं दिल्लीनंतर पहिल्यांदाच एका अन्य राज्याची सत्ता मिळवली आहे. आम आदमी पक्षानं (AAP) या ऐतिहासिक विजयानंतर इंग्लंड आणि मुंबई इंडियन्सचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चरचं (Jofra Archer) जुनं ट्विट शेअर केलं आहे. आर्चर दुखापतीमुळे सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्यानंतरही आयपीएल ऑक्शनमध्ये (IPL Auction 2022) मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) त्याला खरेदी केलं आहे. सध्या फिटनेसवर काम करत असलेला आर्चर त्याच्या जुन्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतो. रशिया-युक्रेन युद्धाला सुरूवात झाल्यानंतरही आर्चरचं एक ट्विट व्हायरल झालं होतं. Russia Ukraine War: जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी पुन्हा खरी! 2014 मधील Tweet Viral आम आदमी पक्षानंही आर्चरच्या जुन्या ट्विटची दखल घेत ते शेअर केलं आहे. आर्चरनं 20 फेब्रुवारी रोजी स्वीप (Sweep) असं ट्विट केलं होतं. त्यावर ‘आप’ नं ‘होय, आम आदमी पक्षानं पंजाबमध्ये स्वीप केले’ असे उत्तर दिलं आहे. आर्चरनं ते ट्विट क्रिकेट सीरिजबाबत केले असेल, पण ‘आप’ नं त्याचा संबंध पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निकालांशी लावला आहे. पंजाबमध्ये ‘आप’ ला मिळालेलं यश हे क्लीन स्वीपपेक्षा कमी नाही, हेच पक्षाला यामधून सुचवायचं आहे.
आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान (Bhagwant Mann) हे पंजाबचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. शहीद-ए-आझम भगतसिंग यांची भूमी असलेल्या खटकड कला येथे ते शपथ घेणार आहेत.