मुंबई, 26 डिसेंबर : क्रिकेट हा अनिश्चित खेळ म्हणून ओळखला जातो. फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूला कधीही बाकावर बसवले जाऊ शकते. असाच प्रकार भारताच्या खेळाडूसोबत घडला, जेव्हा संघात संधी मिळत नव्हती म्हणून त्याच्या करिअरला पूर्णविराम लागणार होता. हा खेळाडू आहे मुंबईकर अजिंक्य रहाणे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे सध्याच्या घडीला कसोटी क्रिकेटमधला सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. आयसीसी कसोटी रॅकिंगमध्ये रहाणे सातव्या क्रमांकावर आहे. मात्र त्याच्या करिअरमध्ये एक अशीही वेळ होती, जेव्हा त्याला अकरा खेळाडूंमध्ये स्थान मिळवणे कठिण झाले होते. भारतीय संघ जेव्हा 2017-18मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना झाली होती. तेव्हा कर्णधार विराट कोहलीनं रहाणेला पहिल्या कसोटी सामन्यात संघात जागा दिली नाही. याबाबत अजिंक्य रहाणेनं पहिल्यांदा एक धक्कादायक खुलासा केला. वाचा- धोनीच्या लाडक्या खेळाडूची कमाल, शतकी खेळी करत महाराष्ट्राचा डाव सावरला ‘त्या क्षणामधून बाहेर पडणं अवघड होते’ हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजिंक्य रहाणेने हा धक्कादायक खुलासा केला. 2017-18मध्ये केप टाऊनमध्ये झालेल्या कसोटी सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडणे रहाणेसाठी धक्कादायक होते. याबाबत सांगताना रहाणेनं, ‘त्या क्षणामधून जाणे मला खूप अवघड होते. स्वत: ला सावरण्यासाठी मला 10 ते 15 मिनिटे लागली. त्यानंतर मला वाटले नाही की ते संघाच्या भल्यासाठी आहे. जर टीम मॅनेजमेंटला असे वाटत असेल की ही प्लेइंग इलेव्हन बरोबर आहे, तर ते बरोबर आहे’,असे मत व्यक्त केले. वाचा- भारताच्या दिग्गज खेळाडूने जाहीर केली निवृत्ती, चाहत्यांना केलं ‘हे’ आवाहन तसेच, ‘क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. मी माझ्या प्रशिक्षकाकडून शिकलो आहे की जेव्हा आपल्याला बाहेर काढले जाते, तेव्हा आपण त्या मागचा उद्देश पाहत नाही तोपर्यंत आपल्याला वाईट वाटते. त्या सामन्यात टीम मॅनेजमेंट ज्या संयोजनासह उतरला तो यशस्वी ठरला की नाही यानं काही फरक पडत नाही. मी संघाच्या निर्णयाचा आदर केला”, असेही रहाणे यावेळी म्हणाला. दरम्यान केप टाऊनमध्ये झालेल्या या कसोटी सामन्यात टीम इंडियाला 72 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर रहाणेला सेंच्युरियन कसोटीत संधी देण्यात आली नव्हती आणि भारतीय संघदेखील हा सामना 135 धावांनी हरवत होता आणि ही कसोटी मालिकादेखील त्याच्या हातातून गेली होती. वाचा- 7 टी-20 आणि 3 वनडे, असे आहे टीम इंडियाचे जानेवारीतील वेळापत्रक रहाणेने जोहान्सबर्ग कसोटीत केली आश्चर्यकारक कामगिरी मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाने तिसर्या कसोटी सामन्यात प्लेन इलेव्हनमध्ये रहाणेला संघात स्थान दिले. जोहान्सबर्गच्या कठीण खेळपट्टीवर रहाणेने दुसर्या डावात टीम इंडियाकडून सर्वाधिक 48 धावांची खेळी केली. भारतीय संघाने हा सामना 63 धावांनी जिंकला. या सामन्याचे नायक शमी आणि बुमराहने 5-5 विकेट घेतल्या परंतु रहाणेचा डावदेखील टीम इंडियाच्या विजयामागील कारण होता.