JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / राहुल द्रविडमुळेच मी....प्रविण तांबेचा चित्रपट येण्यापूर्वी मोठा खुलासा

राहुल द्रविडमुळेच मी....प्रविण तांबेचा चित्रपट येण्यापूर्वी मोठा खुलासा

गेल्या काही दिवसांपासून मराठमोळा क्रिकेटपटू प्रवीण तांबे (Pravin Tambe) चांगलेच चर्चेत आले आहेत. खेळाडूच्या आयुष्यावर आणि त्यांच्या क्रिकेटच्या प्रेमावर आधारीत ‘कौन प्रवीण तांबे’ (kaun hai pravin tambe)हा चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, प्रवीण तांबे यांनी आपल्या कारकिर्दीविषयी मोठा खुलासा केला आहे.

जाहिरात

Pravin Tambe

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 13 मार्च: गेल्या काही दिवसांपासून मराठमोळा क्रिकेटपटू प्रवीण तांबे (Pravin Tambe) चांगलेच चर्चेत आले आहेत. खेळाडूच्या आयुष्यावर आणि त्यांच्या क्रिकेटच्या प्रेमावर आधारीत ‘कौन प्रवीण तांबे’ (kaun hai pravin tambe)हा चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, प्रवीण तांबे यांनी आपल्या कारकिर्दीविषयी मोठा खुलासा केला आहे. आयपीएलमध्ये सर्वात जास्त वयात पदार्पण करणारा खेळाडू म्हणून प्रवीण तांबे यांना ओळखतात. तांबेने 2013 साली वयाच्या 41 व्या वर्षी आयपीएलमध्ये एन्ट्री केली होती. त्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचा टीझर नुकताच लॉंच करण्यात आला होता.‌ विशेष म्हणजे यामध्ये प्रवीणच्या चित्रपटाचे सूत्रसंचालन टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड(Rahul Dravid) यांनी केले आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेयस तळपदे ‘कौन प्रवीण तांबे?’ या चित्रपटात त्याची भूमिका निभावत आहे. चित्रपट भेटीला येण्यापूर्वी प्रवीण तांबेने एका युट्यूब चॅनेलवर यशाचे रहस्य, त्यामागे त्याने राहुल द्रविडचा हात असल्याचे सांगितले. एखादी व्यक्ती यशस्वी होते जेव्हा त्याला त्याची ओळख निर्माण करण्याची संधी मिळते. आणि प्रवीण तांबे यांच्यावर विश्वास ठेवला तर राहुल द्रविडने त्यांना ही मोठी संधी दिली होती. ‘स्पोर्ट्स विथ रविश’ नावाच्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये, प्रवीण तांबेने राहुल द्रविड माझ्यासाठी सर्व काही असल्याचे सांगितले. आज मी जो काही आहे तो राहुल सरांमुळे आहे, असा उल्लेख तांबेने यावेळी केला. जेव्हा लोक माझ्या वयावर सवाल उपस्थित करत होते तेव्हा राहुल सरांनी मला साथ दिली. राहुल सरांनी माझे प्रर्दशन पाहिले. माझ्या बॉलचा परिणार काय होतो ते पाहिलं. आज मी जो काही आहे तो राहुल सरांमुळे. त्यांच्या हाताखाली आयपीएलमध्ये खेळणे, त्याच्याशी बोलणे हे माझे स्वप्न होते, जे प्रत्यक्षात उतरले. राहुल सर मला जा आणि परफॉर्म करण्यास सांगायचे. त्यांचे हे शब्द मला प्रेरणा देत असत. त्यांच्या या शब्दांनी मला नेहमीच पुढे जाण्याची प्रेरणा दिली. आणि, मी माझ्यात प्रगती करत गेलो." अशी भावना प्रवीण तांबेने यावेळी व्यक्त केली. प्रवीण तांबेनं वयाच्या 41 व्या वर्षी आयपीएल मध्ये पदार्पण केलं. राजस्थान रॉयल्स, गुजरात लायन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांकडून तो सामने खेळला आहे. त्याने मुंबई संघाकडून विजय हजारे ट्रॉफीत पदार्पणही केलं होतं. खेळाडू ज्या वयात निवृत्तीचा विचार करतात, त्या वयात प्रवीण तांबेंला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या