JOIN US
मराठी बातम्या / स्पेशल स्टोरी / SPECIAL REPORT : काका की पुतण्या, पवार कुणाला देणार नाशिकमधून उमेदवारी?

SPECIAL REPORT : काका की पुतण्या, पवार कुणाला देणार नाशिकमधून उमेदवारी?

प्रशांत बाग, नाशिक, 06 मार्च : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी जाहीर झाल्यानंतर, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचा नाशिक जिल्हा दौरा हा वादळी ठरला. शरद पवारांनी दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एकदिलाने भाजपविरोधात लढण्याचं आवाहन केलं खरं पण, नाशिकचा उमेदवार कोण असणार हे काही सांगितलंच नाही. पण छगन भुजबळांच्या भाषणाचा संपूर्ण फोकस हा मात्र, फक्त समीरवरच होता. समीर जेलमध्ये माझ्यासोबत नसता तर मी जिवंत बाहेर आलोच नसतो,असं सांगून भुजबळांनी कार्यकर्त्यांना पुरतं भावनिक करून टाकलं. परंतु, नाशिक लोकसभा उमेदवार पवार जाहीर करतील ही अपेक्षा सगळ्यांना होती. मात्र, पवारनीती ही संकेत देणारी ठरली. दोन्ही कॉंग्रेस पुन्हा जोमानं कामाला लागण्यासाठी त्यांनी घेतलेली बैठक खरोखर फलदायी ठरणार का? ही चर्चा सुरू झाली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या