JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / लहान मुलांना का लागते दृष्ट? घराघरातील नजर उतरवण्याचे उपाय खरंच आहेत का उपयोगी?

लहान मुलांना का लागते दृष्ट? घराघरातील नजर उतरवण्याचे उपाय खरंच आहेत का उपयोगी?

अनेकजण याला अंधश्रद्धेचे नावही देतात. परंतु, आस्तिकांचा विश्वास आहे की, दृष्ट लागल्यामुळे मुले आजारी पडतात किंवा खाणे पिणे बंद करतात. दृष्ट लागल्यानंतर जे उपाय केले जातात, त्याविषयी जाणून घेऊया.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 जुलै : हिंदू धर्मातील पूर्वजांच्या काळापासून चालत आलेल्या प्राचीन परंपरा आणि श्रद्धा आजही आपल्या जीवनाचा एक भाग आहेत. यापैकी एक गोष्ट म्हणजे लहान मुलांना दृष्ट लागणे. याविषयी ज्योतिषाचार्य विनोद सोनी पोद्दार म्हणतात की, मुलांना दृष्ट लागणे किंवा वाईट नजर त्यांच्यावर पडू नये यावर तुम्ही मार्ग शोधत असाल, तर सर्वप्रथम तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की दृष्ट लागणे हा आजार नाही. अनेकजण याला अंधश्रद्धेचे नावही देतात. परंतु, आस्तिकांचा विश्वास आहे की, दृष्ट लागल्यामुळे मुले आजारी पडतात किंवा खाणे पिणे बंद करतात. सामान्यतः असे मानले जाते की जेव्हा एखाद्याला दृष्ट लागते तेव्हा त्याची सर्व सकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि त्याचे सर्व चांगले विचार वाईटात बदलू लागतात. ज्यामुळे त्रास होऊ शकतो. काही गोष्टींवरून आपण सहज ओळखू शकतो की, दृष्ट लागली (Nazar Utarnyache Upay) आहे. कसे ओळखायचे दृष्ट लागल्याची - मुलांना दृष्ट लागल्यावर काही लक्षणे लगेच दिसू लागतात. सामान्यत: मुलांमध्ये अशी लक्षणे दिसली की त्यांची दृष्ट काढली जाते. सामुद्रिकशास्त्रानुसार, मुलांना दृष्ट लागल्यानंतर खालील लक्षणे दिसतात. 1- मुलाचे वारंवार आजारपण किंवा चिडचिड. 2- अचानक उलट्या किंवा जुलाब. 3- विनाकारण घराचे आर्थिक नुकसान. 4 - मुलाचे विनाकारण रडणे. 5- डोळ्यांचा रंग बदलणे. 6- अनेकदा त्यामुळे घरातील दूध नासतं. बाळाची दृष्ट काढण्याचे उपाय - 1 - लहान मुले खूपच गोड आणि नाजूक असतात, त्यामुळे त्यांची दृष्ट काढण्यासाठी देवाला अर्पण केलेली नाजूक फुले, साखर किंवा दूध यातून दृष्ट काढता येते. 2- तांब्याच्या भांड्यात पाणी आणि ताजी पानं-फुलं घेऊन बाळाच्या डोक्यापासून पायापर्यंत 11 वेळा उतरवा. ते एका भांड्यात काढा. पण, पानं तुळशीची नसावी. यामुळे बाळावरील वाईट नजरेचा प्रभाव कमी होईल किंवा पूर्ण संपूर्ण जाईल. 3- अशाच प्रकारे दोन्ही हातांच्या मुठीत थोडी साखर घेऊन बाळाच्या डोक्यापासून पायापर्यंत उतरवा. लगेच एखाद्या भांड्यातील पाण्यात सोडून द्या, नंतर ते पाणी बाथरूमच्या पाण्याच्या तीक्ष्ण प्रवाहात टाकून द्या. यामुळे मुलांची दृष्ट निघेल. हे वाचा -  ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा 4- दुधात खडी साखर घालून 4 वेळा उतरवून शिवमंदिर किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवा. यामुळे आपल्या प्रियजनांची दृष्टही निघून जाते. 5 - मीठ, मोहरी, लसूण, सुक्या कांद्याची साले आणि सुक्या लाल मिरच्या लहान मुलावरून सात ते 21 वेळा उतरवून पेटलेल्या चुलीवर किंवा किचनमध्ये जळत्या गॅसवर टाकल्याने वाईट नजर जळून जाते, अशी लोकांची धारणा आहे. हे वाचा -  डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ती सादर केली आहे.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या