मुंबई, 10 ऑगस्ट : रक्षाबंधनाचा सण भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा सण भाऊ आणि बहिणीसाठी खूप खास आहे. भाऊ-बहिणीत वर्षभरात कितीही भांडणे झाली, एकमेकांना कितीही त्रास दिला तरी रक्षाबंधनाला त्याच भांडणाचे रुपांतर प्रेमात होते. या दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. दुसरीकडे, भाऊ आपल्या बहिणीला अनेक भेटवस्तू देतो आणि आपल्या लाडक्या बहिणीचे आयुष्यभर संरक्षण करण्याचे वचन देतो. भाऊ-बहिणीच्या या अनोख्या प्रेमाचे बॉलिवूडमध्ये अनेकदा चित्रीकरण झाले आहे. बॉलीवूडमध्ये अशाच काही ऑन-स्क्रीन भाऊ-बहिणीच्या जोडी आहेत.ज्यांना प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे. दुसरीकडे बॉलिवूडमधला कोणताही सण गाण्याशिवाय पूर्ण होत नाही. बॉलीवूड इंडस्ट्रीनेही भावा-बहिणीच्या नात्यावर हृदयस्पर्शी गाणी दिली आहेत. जी ऐकायला आजही सर्वांना आवडतात. भैया मेरे रखी के बंधन को निभाना -
हे गाणे 50-60 च्या दशकात रिलीज झालेल्या ‘छोटी बहन’ चित्रपटातील बहीण-भावाच्या नात्यावर चित्रित करण्यात आले होते. तेव्हापासून आजपर्यंत हे गाणे हिट लिस्टमध्ये आहे. या गाण्यात बहीण आपल्या भावाला रक्षाबंधनाचे वचन पूर्ण करण्यास सांगते. हे गाणे दिवंगत लता मंगेशकर यांनी गायले होते. . बहनें हसती हैं तो
1991 मध्ये आलेल्या ‘प्यार का देवता’ चित्रपटातील हे गाणे ‘भाई-बहिणी’च्या प्रेमावर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यात मिथुन चक्रवर्तीने भावाची भूमिका साकारली आहे. हे गाणे आजही खूप ऐकले जाते. हे गाणे अलका याज्ञिक आणि मोहम्मद अझीझ यांनी गायले आहे. बहना-ओ-बहना
हे गाणे ‘आज का अर्जुन’मध्ये अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. हे गाणे बप्पी लाहिरी, कविता कृष्णमूर्ती आणि मोहम्मद अजीज यांनी गायले आहे. फूलों का तारों का सबका कहना है
हे गाणे ‘हरे रामा हरे कृष्णा’ चित्रपटातील आहे. हे गाणं तुम्हाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातं, या गाण्यात भाऊ आपल्या बहिणीला आपल्या प्रेमाबद्दल सांगतो. राखीच्या जुन्या गाण्यांमधलं हे सर्वात आवडतं गाणं आहे. हे गाणे झीनत अमान आणि देवानंद यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. हे गाणे किशोर कुमारने गायले आहे. Rakshabandhan 2022: यंदाच्या राखीपौर्णिमेला भद्रकाल; वाचा कधी आणि कसं साजरं करावं रक्षाबंधन बहना ने भाई की कलाई से
हे गाणे ‘रेशम की डोरी’ या चित्रपटातील आहे. हा चित्रपट 1971 मध्ये प्रदर्शित झाला होता, हे गाणे धर्मेंद्र यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. रक्षाबंधनाच्या सणावर बहिणींसाठी जे क्लासिक नृत्य गाणे आहे. हे गाणे सुमन कल्याणपूर यांनी गायले आहे. प्यारा मेरा भैया
हे गाणे ‘क्या कहना’ या बॉलिवूड चित्रपटातील होते. या चित्रपटात भाऊ-बहिणीचं नातं पडद्यावर खूप छान दाखवण्यात आलं आहे. हे गाणे प्रीती झिंटावर चित्रित करण्यात आले आहे. Rakshabandhan 2022: देशातील विविध राज्यांमध्ये रक्षाबंधन कोणत्या नावानं ओळखलं जातं धागों से बांधा
हे गाणे बॉलिवूडच्या आगामी ‘रक्षा बंधन’ चित्रपटातील आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी प्रदर्शित होत आहे. हे भावनिक गाणे प्रेक्षकांना खूप आवडत असून एक भाऊ आपल्या बहिणीची जबाबदारी कशी पार पाडतो, हे या गाण्यात दाखवण्यात आले आहे. हे गाणे अरिजित सिंग, श्रेया घोषाल आणि हिमेश रेशमिया यांनी गायले आहे.