JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Chanakya Niti: या 2 गोष्टींमुळे व्यक्तीवर येते अपमान सहन करण्याची वेळ; ठेवा योग्य अंतर

Chanakya Niti: या 2 गोष्टींमुळे व्यक्तीवर येते अपमान सहन करण्याची वेळ; ठेवा योग्य अंतर

चाणक्य नीतिनुसार, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्यामधील चांगल्या गुणांचा त्याग करू नये. वाईट परिस्थितीमध्ये हेच गुण आपल्या उपयोगात येतात आणि यशस्वी बनवतात.

जाहिरात

चाणक्य नीति टिप्स

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 एप्रिल : चाणक्य हे एक कुशल राजकारणी, चतुर मुत्सद्दी, कुटनिती तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचीत होते. प्रत्येकजण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. यामुळेच त्यांना कौटिल्य म्हटलं जाऊ लागलं. नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. आचार्य चाणक्य यांच्या नीति  कठीण काळामध्ये व्यक्तीला धैर्याने वागण्याची कला शिकवतात. चाणक्य नीतीमुळे व्यक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी ओळखण्याची क्षमता येते आणि शांतीपूर्ण आयुष्यही जगता येतं. त्या नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं सरळ आणि सोपं होतं. खरोखरच सुखी, संपन्न, समाधानी आयुष्य जगायचं असेल तर चाणक्य नीतिनुसार आयुष्य जगा. चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी अनेक गोष्टींबद्दल वर्णन केलं आहे. आयुष्यात येणारी आर्थिक संकटं, वैवाहिक जीवन, नोकरी, व्यापार, मैत्री, शत्रु या सगळ्यांबद्दल आचार्य चाणक्य यांनी काहीनाकाही भाकीतं करून ठेवलेली आहेत. चाणक्य नीतिनुसार, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्यामधील चांगल्या गुणांचा त्याग करू नये. वाईट परिस्थितीमध्ये हेच गुण आपल्या उपयोगात येतात आणि यशस्वी बनवतात. ज्यांच्यामधे चांगले गुण नसतात त्यांना यश आणि सन्मान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. खोटं बोलू नये - आचार्च चाणक्य म्हणतात, खोटं बोलण्याची सवय आपल्याला अंधारामध्ये ढकलते. खोटं बोलणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अपमान सहन करावा लागतो. खोटं बोलण्याची सवय आयुष्यामध्ये संकटच आणते. एक खोटं खरं ठरवण्यासाठी आपल्याला हजारदा खोटं बोलावं लागतं आणि एक ना एक दिवस ते उघडं पडतं आणि मग आपल्याला अपमान सहन करावा लागतो.

निंदा करू नका -  दुसऱ्याची निंदा करणं अतिशय वाईट सवय आहे. त्यामुळे या सवयीपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. निंदा करण्याच्या सवयीला निंदा-रस देखील म्हटलं जातं. एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याची निंदा करायची सवय लागली की, ती आवडायला लागते आणि हाच गुण त्यांच्यासाठी घातक ठरतो. या गुणांपासून जीवनात दूर राहण्याचा प्रयत्न करा हे वाचा -  मंदोदरीला सीतेची माता का म्हटले जाते? या धार्मिक ग्रथांमध्ये सांगितलंय रहस्य (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या