JOIN US
मराठी बातम्या / रिअल इस्टेट / PM Awas Yojana: प्रधानमंत्री आवास योजनेची नवी यादी जाहीर, तुमचं नाव आहे की नाही? असं तपासा

PM Awas Yojana: प्रधानमंत्री आवास योजनेची नवी यादी जाहीर, तुमचं नाव आहे की नाही? असं तपासा

PMAY-G योजना 2022-23 अंतर्गत लाभार्थ्यांची नवीन यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुम्हालाही यादीत तुमचे नाव तपासायचे असेल, तर ‘या’ मार्गांनी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन तपासू शकता.

जाहिरात

PM Awas Yojana: प्रधानमंत्री आवास योजनेची नवी यादी जाहीर, तुमचं नाव आहे की नाही? असं तपासा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 जुलै : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (PM Awas Yojana) सर्व गरीब कुटुंबांना मोफत घरे दिली जातात, त्यासाठी हप्त्याने रक्कम दिली जाते. केंद्र सरकारने 1 एप्रिल 2016 पासून ग्रामीण गृहनिर्माण योजना सुरू केली. या अंतर्गत 2024 पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. माहितीनुसार, पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण अंतर्गत 2.95 कोटी घरे पूर्ण केली जाणार आहेत. 21 फेब्रुवारी 2022 पर्यंत एकूण 1.73 कोटी घरे पूर्ण झाली आहेत. PMAY-G अंतर्गत निवड 2011 च्या डेटानुसार, एखाद्या कुंटुंबाला निवासाची उपलब्धता नसल्यास  या योजनेअंतर्गत त्यांना निवासाची उपलब्धता करून दिली जाते. यानंतर लाभार्थ्यांची यादी (beneficiaries list of PM Awas Yojana) ग्रामसभेद्वारे प्रमाणित केली जाते. तुम्हालाही पीएम आवास योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असल्यास, तुम्हाला प्रथम पीएम आवास योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. यानंतर तुमचे नाव यादीत येऊ शकते. यानंतर ते ग्रामसभेद्वारे अंतिम केलं जाईल. PMAY-G लाभार्थी यादी कशी तपासावी किंवा डाउनलोड करावी? (How to Check PMAY-G beneficiaries list?) - सर्व प्रथम अधिकृत PMAY-G वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर जा. त्यानंतर सर्वात वर तुम्हाला “Awaassoft” टॅब मिळेल. निवास टॅबवर क्लिक करा आणि नंतर “रिपोर्ट” वर क्लिक करा. आता तुम्हाला पुन्हा एका नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केलं जाईल. हेही वाचा- पर्सनल लोन इतर कर्जांपेक्षा महाग का असतं? काय आहेत कारणं?

 येथे H विभागातील सोशल ऑडिट रिपोर्ट वर जा.

आता “सत्यापनासाठी लाभार्थी तपशील” फॉर्मवर क्लिक करा. त्यानंतर तुमचे राज्य, पंचायत, उपविभाग तपशील, वर्ष निवडा आणि कॅप्चा कोड भरा आणि सबमिट करा. आता तुमच्या समोर संपूर्ण यादी असेल, जी तुम्ही पाहू शकता. हेही वाचा-  सावधान! WhatsApp वापरताना कधीही करू नका या चुका, नाहीतर जावं लागेल तुरुंगात PMAY-G योजना 2022-23 अंतर्गत लाभार्थ्यांची नवीन यादी प्रसिद्ध झाली आहे. तुम्हालाही यादीत तुमचे नाव तपासायचे असेल, तर तुम्ही वर नमूद केलेल्या पद्धतीने त्याच्या अधिकृत वेबसाइटवर तपासू शकता. त्याचबरोबर एमआयएस-आवास सॉफ्ट आणि आवास अ‍ॅपच्या माध्यमातून लोकांना अर्ज करण्यापासून ते यादी तपासण्यापर्यंतच्या सुविधाही दिल्या जातात. योजनेंतर्गत मॉनिटरिंग एंड-टू-एंड ई-गव्हर्नन्स सोल्यूशन्स, आवाससॉफ्ट आणि आवास अ‍ॅपद्वारे केले जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या