मुंबई, 4 एप्रिल : स्वतःचं घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपल्या घरासाठी लोक आयुष्यभर कष्ट करत असतात. पण प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील पहिलं घर हे त्याचं स्वप्न आणि गरजही असते. मात्र पहिल्या घरानंतरचं घर किंवा जागा आपण साधारणपणे एक गुंतवणूक म्हणून घेत असतो. त्यामुळे घर विकणं आणि विकत घेणं या दोन्ही बाबी गुंतवणुकीच्या दृष्टीने फायदेशीर असतात. मात्र ज्याप्रमाणे प्रॉपर्टी विकल्यावर कॅपिटल गेन (Capital Gain) मोठ्या प्रमाणावर होतो तसंच त्यावर टॅक्सदेखील (Tax) लागतो. त्यामुळे प्रॉपर्टी विकल्यावर लागणाऱ्या टॅक्ससाठी सरकारचे काय नियम आहेत हे जाणून घेणं महत्वाचं आहे. योग्य नियम पाळून जर प्रॉपर्टीचा व्यवहार केला तर तुमचं कॅपिटल गेन टॅक्स फ्री होऊ शकतं. या बाबतची सविस्तर माहिती TV 9 हिंदी ने दिली आहे. होम रिपेमेंटवर टॅक्समध्ये अनेक प्रकारची सूट दिली जाते. आयकर नियमांनुसार, घर खरेदी केल्यापासून पाच वर्षांच्या आत तुम्ही ती प्रॉपर्टी विकली तर तुम्हाला देण्यात आलेले टॅक्स बेनिफिट्स (Tax Benefits) मागे घेतले जातात. नियमांनुसार, 5 वर्षांच्या आत तुम्ही प्रॉपर्टी विकली तर सेक्शन 80 C अंतर्गत टॅक्समध्ये मिळालेली सूट परत घेतली जाते. सेक्शन 80 C ची मर्यादा 1.5 लाख रुपये आहे आणि यामध्ये होम लोनच्या ईएमआयच्या प्रीमियम अमाउंटचादेखील समावेश असतो. याशिवाय यात रजिस्ट्रेशन फी आणि स्टॅम्प ड्यूटीचादेखील समावेश असतो. तसंच ज्या आर्थिक वर्षात तुम्ही घर विकलं त्या आर्थिक वर्षात टॅक्समध्ये मिळालेला लाभ तुमच्या एकूण इन्कममध्ये समाविष्ट होईल आणि त्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. मात्र सेक्शन 24(B) अंतर्गत इंटरेस्ट अमाउंटवर (Interest Amount) मिळणारा लाभ परत घेतला जात नाही. Sri lanka Crises: श्रीलंकेसारखी भीषण स्थिती भारतातही निर्माण होऊ शकते, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली चिंता तुम्ही ज्या दिवशी घराचा ताबा घेतला त्या दिवसापासून दोन वर्षांच्या आत जर तुम्ही ते घर विकलं तर कोणत्याही प्रकारच्या कॅपिटल गेनवर शॉर्ट टर्म कॅपिटल टॅक्स (Short Term Capital Tax) लागेल. तसंच जर ताबा घेतल्याच्या दोन वर्षांनंतर घर विकल्यास कॅपिटल गेनवर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स (Long Term Capital Tax) आकारला जाईल. यातील शॉर्ट टर्म कॅपिटल गेन तुमच्या एकूण इन्कममध्ये समाविष्ट असेल आणि तुम्ही ज्या टॅक्स श्रेणीत असाल त्यानुसार तुम्हाला टॅक्स लागेल. तर लाँग टर्म कॅपिटल गेनवर 20 टक्के कॅपिटल गेन टॅक्स आकारला जातो. यासोबतच महागाईमुळे मिळणारा लाभदेखील मिळेल. तुम्ही जुनं घर विकल्यानंतर मिळालेल्या कॅपिटल गेनवरदेखील टॅक्स लागतो. मात्र हा वाचवता येऊ शकतो. नियमानुसार, जुनी संपत्ती विकल्यानंतर नवी संपत्ती खरेदी करून टॅक्स वाचवता येऊ शकतो. आता दोन प्रॉपर्टी खरेदी करण्याची मुभा आहे. नियामानुसार ज्या दिवशी तुम्ही प्रॉपर्टी विकली आहे, त्या दिवसापासून एका वर्षाच्या आत दुसरी प्रॉपर्टी खरेदी केली असेल तर टॅक्समध्ये सवलतीची मागणी करता येते. घर विकल्यानंतर पुढील तीन वर्षांत नवं घर बांधलं तरीदेखील टॅक्समध्ये सूट मिळू शकते. तसंच घर विकल्यानंतर पुढील दोन वर्षांत एखादी दुसरी प्रॉपर्टी खरेदी केली तरीदेखील टॅक्समध्ये सूट मिळते. HDFC-HDFC Bank merger : HDFC खातेधारकांसाठी मोठी बातमी, बँकेच्या विलीनीकरणाचा होईल सर्वाधिक फायदा तुम्हाला जुनी प्रॉपर्टी विकून नवी प्रॉपर्टी विकत घ्यायची नसेल तरीदेखील तुम्हाला कॅपिटल टॅक्समध्ये सूट मिळू शकते. यासाठी सेक्शन 54 (EC) अंतर्गत प्रॉपर्टी विकल्यावर मिळणारा कॅपिटल गेन तुम्ही सहा महिन्यांच्या आत NHAI, RECL च्या तीन वर्षांच्या बाँडमध्ये मध्ये गुंतवू शकता. हा बाँड खरेदी केल्यानंतर एका आर्थिक वर्षामध्ये जास्तीतजास्त 50 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर टॅक्समध्ये सूट मिळते. याव्यतिरिक्त संपूर्ण लाँग टर्म कॅपिटल गेनची गुंतवणूक टेक्नॉलॉजी स्टार्टअपमध्ये केली जाऊ शकते, त्यावर कोणताही टॅक्स लागत नाही.