JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Mahavikas Aghadi : '2024 साठीही ठाकरे-राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री ठरला होता, पण...', काय होता प्लान?

Mahavikas Aghadi : '2024 साठीही ठाकरे-राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री ठरला होता, पण...', काय होता प्लान?

उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अलिखित करार झाला होता, यामध्ये 2024 साठीचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारही ठरला होता, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

जाहिरात

ठाकरे आणि शरद पवारांमध्ये अलिखित करार?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 17 जून : महाराष्ट्रातल्या राजकीय भुकंपाला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. 20 जूनला विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांसह बाहेर पडले, यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि महाविकासआघाडी सरकार कोसळलं. महाविकासआघाडी सरकार कोसळल्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवा दावा केला आहे. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अलिखित करार झाला होता, असं बावनकुळे म्हणाले आहेत. पुण्यामध्ये भाजपच्या टिफीन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी बावनकुळे बोलत होते. ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांच्या खिशात पेन नव्हता. अजित पवार सकाळी सात पासून मंत्रायलायत बसतात, आमचे मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाही, असं शिवसेनेचे अनेक आमदार सांगत होते. 75 टक्के शिवसेनेचे आमदार नाराज आहेत, हे मी सत्तांतराआधी अनेकवेळा सांगत होतो,’ असं बावनकुळे म्हणाले. प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर, फुलंही उधळली ‘उद्धव ठाकरे आदित्यच्या प्रेमात होते आणि त्यांचा अलिखित करारनामा झाला होता. 2019 ते 2024 उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री. राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि नेत्यांनी मिळून शिवसेना कमी करायची, शिवसेनेचे आमदार कमी करायचे, अशी छुपी युती आणि सहमती उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीला दिली होती. राष्ट्रवादीचे 100 आमदार करायचे आणि आपले आमदार कमी करायचे. 2024 मध्ये सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं आणि आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री करायचं, हा अजेंडा ठरला होता,’ असा दावा बावनकुळे यांनी केला आहे. ‘शिवसेना आमदारांना कळालं तेव्हा पराभव होऊ नये म्हणून ते बाहेर पडले. आपण निवडून येऊ का नाही? ही भीती शिवसेनेच्या आमदारांना उद्धव ठाकरे असताना होती. या भीतीमुळे हे सत्तापरिवर्तन झालं,’ असं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या