पुणे, 27 ऑगस्ट: ऐन रक्षाबंधनाच्या (Crime on Rakshabandhan) दिवशी पुण्यातील एका महिलेचं तब्बल 8 लाखांचं नुकसान झालं आहे. भावाला राखी बांधून परत येत असताना, एका अज्ञात चोरट्यानं संधी साधून फिर्यादी महिलेचा तब्बल 8 लाखांचा ऐवज लंपास (Rs 8 lakh ransom) केला आहे. याप्रकरणी 35 वर्षीय महिलेनं सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल (FIR Lodged) केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. नेमकी घटना काय आहे? पुण्यातील (Pune) सहकारनगर येथील ट्रेझर पार्क परिसरात राहणारी 35 वर्षीय महिला रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावाला राखी बाधण्यासाठी गेल्या होत्या. भावाला राखी बाधल्यानंतर संबंधित महिला मंगळवारी सायंकाळी आपल्या कारने घरी परत येत होती. दरम्यान सहकारनगर परिसरातील अहिल्यादेवी चौकातून वडापाव घेण्यासाठी महिलेनं कार थांबवली. फिर्यादी महिला वडापाव घेण्यासाठी उतरल्या असता, त्यांच्या कारमधून अज्ञात चोरट्यानं रोख रक्कमेसह सोन्या चांदीच्या दागिने लंपास केले आहेत. हेही वाचा- Pune: सहकारी बँकांना RBI चा दणका, नियमांचं उल्लंघन केल्याने ठोठावला लाखोंचा दंड अज्ञात चोरट्यानं कारमधील 10 हजार रुपयांच्या रोकडसह सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 8 लाख 11 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी 35 वर्षीय महिलेनं सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सहकारनगर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. नेमकी चोरी कोणी केली याबाबत कोणताही पुरावा अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.