JOIN US
मराठी बातम्या / पुणे / नागालँडमधील पाठिंब्यावर अखेर सुप्रिया सुळे बोलल्या; एका शब्दात विषय संपवला

नागालँडमधील पाठिंब्यावर अखेर सुप्रिया सुळे बोलल्या; एका शब्दात विषय संपवला

नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजप सत्तेत असलेल्या सरकारला पाठिंबा दिला आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जाहिरात

सुप्रिया सुळे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 9 मार्च :  नागालँडमध्ये राष्ट्रवादीने सरकारला पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे नागलँडमध्ये भाजप देखील सत्तेत आहे. भाजप सत्तेत असताना राष्ट्रवादीने सरकारला पाठिंबा दिल्यानं यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अधिवेशनामध्ये देखील याचे पडसाद उमटल्याचं पहायला मिळत आहे. सत्ताधारी आमदारांकडून पन्नास खोके नागालँड ओकेच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार देखील आक्रमक झाले. यावर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? पवार साहेब बोलले आहेत, आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे तेथील सरकारला नाही. पवार साहेबांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांना बोलण्याची गरज नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत.  यावर देखील सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही आमच्या अपेक्षा सरकारपर्यंत पोहोचवल्या आहेत. आता बजेट जाहीर झाल्यावर बघुयात असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांची प्रतिक्रिया   दरम्यान दुसरीकडे संजय राऊत यांनी देखील नागालँडमधील राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर प्रतिक्रिया दिली आहे.  भाजपनं नागालॅंडमध्ये सत्ता स्थापन केलेली नाही. नागालॅंड हे सीमावर्ती राज्य आहे, संवेदनशील राज्य आहे. सर्वांनी एकत्रित येऊन हे सरकार बनवलं आहे. असा प्रयोग तिथे या आधी देखील झाला आहे. कारण ती त्या राज्याची गरज आहे. लोकांपर्यंत पोहोचण्यात राष्ट्रवादी काँग्रेस कमी पडत आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या