JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पत्नीच्या औषधोपचारासाठी उपलब्ध होत नव्हते पैसे, पतीनं उचललं टोकाचं पाऊल

पत्नीच्या औषधोपचारासाठी उपलब्ध होत नव्हते पैसे, पतीनं उचललं टोकाचं पाऊल

बारामतीत (Baramati) एक धक्कादायक (shocking incident) घटना घडली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बारामती, 25 ऑक्टोबर: बारामतीत (Baramati) एक धक्कादायक (shocking incident) घटना घडली आहे. पत्नीच्या औषधोपचारासाठी पैसे उपलब्ध होत नसल्यानं पतीनं टोकाचं पाऊल उचललं आहे. नैराश्यातून पतीने झाडाला गळफास घेऊन (committed suicide)आत्महत्या केली आहे. बारामती तालुक्यातील कुतवळवाडी येथे ही घडली आहे. या दुर्दैवी घटनेनं परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. 35 वर्षीय मनोहर संभाजी कुतवळ असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. हेही वाचा-   India vs Pakistan: पाकिस्तानच्या विजयानंतर बाबर आझमच्या वडीलांना अश्रू अनावर, VIDEO VIRAL   सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुतवळ यांची पत्नी गेले काही दिवसांपासून आजारी होती. पुण्यातील एका रुग्णालयात त्यांच्या पत्नीवर औषधोपचार सुरु होते. रुग्णालयाने पैसे भरण्यास सांगितलं होतं. मात्र पैशांची जुळवाजुळव होत नव्हती, त्यामुळे मनोहर तणावात होता. त्यांनी जवळपास साडेचार लाख रुपये जमा करून करुन रुग्णालयात भरले होते. मात्र अजून रक्कम भरण्याचा निरोप आल्यानंतर पहाटे एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या