JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Shiv Jayanti 2023 : शिवरायांचा पहिला अश्वारूढ पुतळा, राजर्षी शाहूंची होती संकल्पना, पाहा Video

Shiv Jayanti 2023 : शिवरायांचा पहिला अश्वारूढ पुतळा, राजर्षी शाहूंची होती संकल्पना, पाहा Video

Shiv Jayanti 2023 : जगातील सर्वात पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा पुण्यामध्ये उभारला गेला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नीलम कराळे, प्रतिनिधी पुणे, 18 फेब्रुवारी : शिवरायांचा आठवावा प्रताप! शिवरायांचे आठवावे रूप! असं म्हणत आपल्या सर्वांच्या नजरेमध्ये शिवरायांचे विविध रूपे येत असतात. सर्वात मनमोहक रूप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ तेजस्वी रूप होय. आपण अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाहिला असेल. मात्र, तुम्हाला माहिती आहे का की जगातील सर्वात पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा पुण्यामध्ये उभारला गेला होता. मूळ कल्पना कोणाची होती? 1928 मध्ये पुण्यात जगातील सर्वात पहिला अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुण्यात उभारण्यात आला. हा पुतळा पुण्यातील श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलच्या आवारात आहे. पुतळा उभारण्याची मूळ कल्पना राजर्षी शाहू महाराजांची होती. मात्र, शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर आपल्या वडिलांची ही इच्छा छत्रपती राजाराम महाराजांनी पूर्ण केली, अशी माहिती शिवजन्म उत्सव समितीचे अध्यप्रवर्तक संस्थापक अमित गायकवाड यांनी दिली.

कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांची इच्छा होती की; शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा पुण्यात उभारला जावा. 1921 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते पायाभरणी समारंभ झाला. 1928 मध्ये शिवजन्माला 300 वर्ष पुर्ण होणार म्हणून हा पुतळा 1928 मध्ये उभारायचा असे ठरवले. आपल्या वडिलांचे हे स्वप्नं छत्रपती राजाराम महाराज यांनी पूर्ण केले. या पुतळ्याचे अनावरण मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते झाले. नानासाहेब करमरकर यांनी हा ब्राँझचा अश्वारूढ पुतळा साकारला. हे काम ख्यातनाम शिल्पकार श्री गणपतराव म्हात्रे यांना दिले. तर करमरकर यांनी पॅनेल्स तयार करणे असे ठरले. या पॅनेल्सवरती शिवरायांचे शौर्य, राजकारणपटुत्त्व, धर्मावरील श्रद्धा आणि नितीमत्ता दाखवायची होती. म्हात्रे यांना काम वेळात पुर्ण करणे अशक्य दिसू लागले. म्हणून हे काम करमरकरांनी पुर्ण करावे असे छत्रपती राजाराम महाराजांनी सांगितले.

Shiv Jayanti 2023 : तब्बल 21 फुटांची कवड्यांची माळ ठरणार शिवजयंतीचं खास आकर्षण, Video

संबंधित बातम्या

पुढे करमरकरांनी अखंड पूर्णाकृती अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बनवला. या पुतळ्याची उंची साडे तेरा फूट उंच असून तेरा फूट लांब हा पुतळा आहे. आणि साडे तीन फूट रुंद हा पुतळा आहे. या पुतळ्याच्या हातातील 54 इंचाची तलवार आहे. पूर्ण पुतळा हा आठ टणाचा आहे. हा ब्रान्झ धातू मधला ओतीव पुतळा असून या पुतळ्याला बनवण्यासाठी 16 टन धातू लागला. पुण्यात छत्रपतींचा पुतळा आणल्यानंतर पुतळा ओढण्यासाठी रणगाडा आणि 20 बैलगाड्या जुंपण्यात आल्या. तरिही पुतळा पुढे नेणे अशक्य झाल्यानं नगरपालिकेचा स्टीम रोलर बोलवण्यात आला आणि हा पुतळा बसवला गेला. यासोबतच या पुतळ्याच्या खाली शिवाजी महाराजांची चार महत्वपूर्ण शिल्पे देखील आहेत. यामध्ये आई तुळजाभवानी शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचे संगमरवरी शिल्प आहे तसेच जगातील पहिले शिवराज्याभिषेकाचे शिल्प देखील याच ठिकाणी आहे, असं अमित गायकवाड यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या