JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Mahavikas Aghadi : पुण्याचा तिढा सुटेना, आता आणखी एका जागेवरून महाविकास आघाडीमध्ये सामना होणार?

Mahavikas Aghadi : पुण्याचा तिढा सुटेना, आता आणखी एका जागेवरून महाविकास आघाडीमध्ये सामना होणार?

पुणे लोकसभा मतदार संघ कुणाच्या वाट्याला जाणार महाविकास आघाडीतील हा वाद संपत नाही तोच आता आणखी एका जागेवरून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.

जाहिरात

आणखी एका जागेवरून महाविकासआघाडीत दावे-प्रतिदावे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गोविंद वाकडे, प्रतिनिधी शिरूर, 1 जून : पुणे लोकसभा मतदार संघ कुणाच्या वाट्याला जाणार महाविकास आघाडीतील हा वाद संपत नाही तोच आता शिरूर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीचा नवा पेच महाविकास आघाडी समोर उभा राहिला आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी शिरूर राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या कार्याला कमी लेखल्याने या मतदार संघातील वाद अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिरूर पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत सधन आणि राजकीय दृष्ट्या सत्ताकेंद्र मानल्या जाणाऱ्या लोकसभा मतदार संघ. या मतदार संघावर राष्ट्रवादीची तशी मजबूत पकड आहे, मात्र आता पक्षांतर्गत कुरघोड्या वाढल्याने पक्षातील नेतेच एकेमकाना आव्हान देताना दिसत आहेत. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुका आपण लढणार आणि जिंकणारच, असा निर्धार व्यक्त करत राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शड्डू ठोकत पक्षालाच घराचा आहेर दिला आहे. एव्हढच नाहीतर लोकसभेची तयारी सुरू केल्याचं सांगण्यासाठी लांडे यांनी लाखो रुपये खर्च करत बॅनरबाजीही केली आहे. शिरसाटांच्या क्लिन चिटवर अंधारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या राज्याचे गुणी गृहमंत्री… विशेष म्हणजे शिरूर लोकभेची ही जागा महाविकास आघाडीतून कोणत्या पक्षाला दिली जाणार हे ठरलेलं नसतानाही उद्धव ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख सचिन आहेर यांनी विलास लांडे यांच्या कामाचा कौतुक केलंय. ते कायमचे लोकप्रतिनिधी असावेत अशा राजकीय शुभेछा दिल्या आणि अतिशय चतुरपणे लांडे यांना झुकतं माप देत खासदार अमोल कोल्हे यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. खरतर उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत कोल्हे यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते लगेच खासदार म्हणून निवडून आले, मात्र सद्य परिस्थितीत याही मतदारसंघात राष्ट्रवादी समोर भाजपचं तगडं आव्हान असणार आहे, अशा वेळी अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीसाठी हुकुमाचा एक्का ठरू शकले असते, मात्र मागील काही काळापासून कोल्हे यांची भाजपशी वाढलेली सलगी राष्ट्रवादीला खटकली होती, म्हणूनच गुजरात निवडणुकात, राष्ट्रवादीने अमोल कोल्हे यांचा समावेश स्टार प्रचारकांच्या यादीत केला नव्हता. आता एकीकडे विलास लांडे आणि दुसरीकडे सचिन आहिर या दोघांनीही कोल्हे यांना लक्ष केलंय. या दोघांच्याही आव्हानाला कोल्हे यांनी मोठ्या मार्मिक शब्दात उत्तर देत लांडे यांना शुभेच्छा दिल्या. आता शिरूर लोकसभा मतदार संघात निर्माण झालेला हा पेच लगेच सोडवला गेला नाही, आणि लोकसभा निवडणुकीत लांडे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली, तर मोठ्या प्रमाणात मत विभाजन होऊन याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो, त्यामुळे आता महाविकास आघाडी काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागलं आहे. शिरूरमधून तिकीट कोणाला? लांडे की कोल्हे, जयंत पाटलांचा ऑन द स्पॉट फैसला!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या