JOIN US
मराठी बातम्या / पुणे / समीर वानखेडेंवर खंडणीच्या आरोपानंतर चंद्रकांत पाटलांची सावध प्रतिक्रिया, म्हणाले...

समीर वानखेडेंवर खंडणीच्या आरोपानंतर चंद्रकांत पाटलांची सावध प्रतिक्रिया, म्हणाले...

‘समीर वानखेडे हा भाजपचा कार्यकर्ता नाही. त्यामुळे त्याची पाठराखण करायचा विषय येत नाही’

जाहिरात

'समीर वानखेडे हा भाजपचा कार्यकर्ता नाही. त्यामुळे त्याची पाठराखण करायचा विषय येत नाही'

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 24 ऑक्टोबर : आर्यन खान अटक (Aryan Khan arrest case) प्रकरणी पंच किरण गोसावी (kiran gosavi) याने शाहरुख खानकडे  25 कोटींची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर भाजपही बॅकफूटवर गेली आहे. ‘समीर वानखेडे ((sameer wankhede) ) हा काही भाजपचा कार्यकर्ता नाही, त्यामुळे त्याची पाठराखण करायचा विषय येत नाही’ अशी सावध प्रतिक्रिया भाजपचे (bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी दिली. पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी आर्यन खान अटक प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली. ‘समीर वानखेडे हा भाजपचा कार्यकर्ता नाही. त्यामुळे त्याची पाठराखण करायचा विषय येत नाही. जर या प्रकरणी आज काही एनसीबीवर आरोप करण्यात आले आहे. ज्यांनी कुणी केले आहे. त्या आरोप केले असल तर त्याची चौकशी व्हावी, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. Aryan Drug Case:खंडणीच्या आरोपानंतर समीर वानखेडेंची मुंबई पोलीस आयुक्तांकडे धाव शरद पवारांनी पुण्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, या मुद्यावरून चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.  ‘शरद पवार हळूहळू अजित पवारांच्या हातात असलेल्या ऑल पिंपरी-चिंचवड आणि पुणे दोन्ही काढून घेत आहे, एकाप्रकारे अजित पवार यांची ताकद कमी केली जाते आहे’ असा दावाही पाटील यांनी केला. दरम्यान, समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून कोणतीही कारवाई करू नये, अशी विनंती केली आहे.

संबंधित बातम्या

‘माझ्यावर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे आरोप होत आहे. माझ्यावर गुप्त हेतू ठेवण्यासाठी कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही याची खात्री करावी, अशी मागणी समीर वानखेडे यांनी पत्राद्वारे पोलीस आयुक्तांना विनंती केली आहे. तसंच, मला ड्रग्स प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली जाऊ नये, हे प्रकरण माझ्या वरीष्ठाकडे आहे. या’ तरुण नेत्याला पाहायचं पंतप्रधानपदी; दीपिका पादुकोनची इच्छा होणार का पूर्ण? मला तुरुंगात टाकण्याच्या आणि सर्विसमधून काढून टाकण्याच्या धमक्या काही लोकांकडून देण्यात आल्या.. हे प्रकरण डीडीजी यांनी एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपवलं आहे. त्यामुळे पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जाऊ नये, अशी विनंतीच वानखेडेंनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या