JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Sambhaji Raje: संभाजीराजेंनी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय, पुण्यातून केली मोठी घोषणा

Sambhaji Raje: संभाजीराजेंनी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय, पुण्यातून केली मोठी घोषणा

Sambhaji Raje Press Conference: संभाजीराजे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी संभाजीराजे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

जाहिरात

Sambhaji Raje:संभाजीराजेंनी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय, पुण्यातून केली मोठी घोषणा

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 12 मे : आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी 12 मे रोजी आपली नवी दिशा ठरवणार असल्याचं जाहीर केलं. त्यानुसार, संभाजीराजे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संभाजीराजे यांनी मोठी घोषणा केली आहे. आपण राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचं संभाजीराजे यांनी जाहीर केलं आहे. संभाजीराजे म्हणाले, दोन निर्णय मी घेतले आहेत. त्यापैकी पहिला निर्णय राज्यसभ्येच्या संदर्भातील आहे. राज्यसभेचं समीकरण पाहिलं तर जूनमध्ये 6 जागा रिक्त होत आहेत. यापूर्वी 3 जागा भाजप 1 जागा राष्ट्रवादी,1 सेना ,1 काँग्रेस अशी होती. आता समीकरण बदललं भाजपला दोन, काँग्रेसला 1, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस 1 जागा, उरलेली 1 जागा आहे. मी निवडणूक लढवणार आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. 42 मताचा कोशंत पूर्ण करावा लागेल, 28 मत शिल्लक आहेत …आता राजकीय पक्षांनी ठरवावं. अपक्ष म्हणून सर्वांनी पाठिंबा द्यावा. जे छोटे मोठे पक्ष आहेत ज्यांना व्हीप नाही त्यांनी जाहीर भूमिका घेत मला समर्थन द्यावं. आपण मला राज्यसभेत पाठवावं म्हणून मी सर्वपक्षांना विनंती करु इच्छितो. मी स्पष्टपणे सांगतो की, मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. मी आजपासून कुठल्याही पक्षाचा सदस्य नाहीये. दुसरी घोषणा अशी की, स्वराज्य नावाची आपण संघटना स्थापन करत आहोत. शिवाजी महाराज, शाहू महाराजांवर प्रेम करणाऱ्यांना एका छता खाली आणायचा प्रयत्न आहे, समाजाला नवी दिशा देण्यासाठी, अन्याय होत असेल तिथे अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी, शिवाजी महाराज, शाहु महाराजांचे नाव जगभरात पोहोचवण्यासाठी स्वराज्य नावाच्या संघटनेची स्थापना करत आहोत असं संभाजीराजेंनी म्हटलं. वाचा :  नाना पटोलेंचं वक्तव्य हास्यास्पद, केवळ हेडलाईन मिळवण्यापुरतं : अजित पवार या पत्रकार परिषदेत संभाजीराजे म्हणाले, गोंदिया जिल्हा सोडला तर पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. शाहू महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्याची संधी होती. शेतकऱ्यांचे प्रश्न, ओला कोरडा दुष्काळ ,कामगारांचे प्रश्न ,विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले. हे देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मला विनंती केली आपण राष्ट्रपती नियुक्त खासदार व्हावं महणून ते पद स्वीकारलं. म्हणून राष्ट्रपती,पंतप्रधान देवेंद्र फडणवीस यांचे आभार. संभाजीराजे म्हणाले, मी मोदींना भेटलो तेव्हाच मी त्यांना पुस्तक दिलं होत आणि त्याच विचाराने मी चालणार हे स्पष्ट केलं त्यामुळे राजकारण विरहित काम केलं, गरज असेल तिथे गेलो. माझा कार्यकाळ समाज हिताच्या दृष्टीने मी केलेले कार्यक्रम… शिवराज्याभिषेक समिती स्थापना करून दिल्लीत व्यापक स्वरूपात साजरी करायला सुरुवात झाली. शाहू महाराजांची जयंती दिल्लीत पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर सुरुवात केली. राज्याभिषेक मोठ्या प्रमाणात सुरू झाला. 25 देशाचे राजदूत आले होते, मी संसदेत शिवाजी शाहू, फुले, आंबेडकर यांचेच विचार मांडले, गडकोट किल्ल्यांसाठी बोललो. मी बोलल्यावर रायगडावर राष्ट्रपती आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या