राज ठाकरेंची पुण्यात 50 हजार रुपयांची पुस्तक खरेदी, पाहा VIDEO
पुणे, 18 मे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हे पुणे (Pune) दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान मंगळवारी (17 मे 2022) राज ठाकरेंनी पुण्यातील अक्षरधारा बुक गॅलरीला (akshardhara book gallery) भेट दिली. यावेळी राज ठाकरे यांनी तेथे रात्री उशीरापर्यंत जवळपास दीड तास पुस्तक खरेदी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांनी जवळपास 50 हजार रुपयांची पुस्तके पुण्यातून खरेदी केली आहेत. या संदर्भात अक्षरधारा बुक गॅलरीचे संचालक रमेश राठिवडेकर यांनी सांगितले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुक गॅलरीला भेट दिली. जवळपास त्यांनी दीड तास पुस्तके पाहिली.
प्रामुख्याने त्यांनी ऐतिहासिक, सामाजिक विषयाची पुस्तके, कला, आत्मचरित्र अशी जवळपास 50 हजार रुपयांची पुस्तके त्यांनी खरेदी केली आहेत.
राज ठाकरे यांच्याकडे यापूर्वी पुस्तके होती पण त्यांची काही पुस्तके कुणालातरी देण्यात आली. त्यानंतर अशी पुस्तके त्यांनी पुन्हा खरेदी केली. मृत्यूंजयची डिलक्स आवृत्ती, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे राजा शिवछत्रपती इंग्रजी पुस्तक खरेदी केलं असंही रमेश राठिवडेकर यांनी सांगितले. राज ठाकरे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीवर भडकले सडेतोड आणि परखड भाष्य करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. पण, आज याचीच झलक प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पाहण्यास मिळाली. जगू द्याल की नाही? असा सवाल करत राज ठाकरे पुण्यात पत्रकारांवर भडकले. राज ठाकरे अचानक भडकल्यामुळे पत्रकारांमध्येही गोंधळ उडाला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. पुण्यात 21 मे रोजी राज ठाकरेंची सभा होणार आहे. याआधी राज ठाकरे पुण्यात पोहोचले आहे. पुण्यातील प्रसिद्ध असलेले दुकान अक्षरधारा इथं राज ठाकरे पोहोचले होते. यावेळी ते काही पुस्तकं खरेदी करण्यासाठी पोहोचले होते. राज ठाकरे हे अक्षरधारामध्ये पोहोचण्याची माहिती मिळताच प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी तिथे पोहोचले. राज ठाकरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न पत्रकार करत होते. त्यामुळे अचानक राज ठाकरे भडकले आणि जगू द्याल की नाही? असा सवालच राज ठाकरेंनी पत्रकारांना केला. त्यामुळे पत्रकारांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर राज ठाकरे हे पुस्तक खरेदी करून माध्यमांच्या प्रतिनिधींशी न बोलता निघून गेले.