ganpati festival 2021: आता मंडळात जाऊन गणेश मूर्तींचे दर्शन घेता येणार नाही. त्याऐवजी ऑनलाईन दर्शन घेता येईल अशी व्यवस्था गणेश मंडळांना करून द्यायची आहे.
पुणे, 3 ऑगस्ट : कोविड 19 मुळे (Covid 19) उद्भवलेली परिस्थिती आणि कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव (Sarvajanik Ganeshotsav) साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात पुणे महानगरपालिकेने मार्गदर्शक सूचना (Pune Municipal Corporation Guidelines for Ganeshotav) जारी केल्या आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुण्यात सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सवात मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे ढोल ताशांच्या तालावर प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जन अशा दोन्ही वेळी मिरवणूक काढता येणार नाही. याआधी राज्य सरकारनं साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नियमावली जारी केली आहेच. आता पाठोपाठ महापालिकेनेही सूचना जारी केल्या आहेत. जाणून घेऊयात काय आहेत या मार्गदर्शक सूचना आणि नियमावली. अशी आहे नियमावली मंडळाची गणेश मूर्ती 4 फूट तर घरगुती मूर्ती 2 फूट असावी मंडळांना पालिकेकडून परवानगी घ्यावी लागणार लहान मंडप घालावे लागणार देणगी, वर्गणी ऐच्छिक मिरवणूक काढू नये आरती, भजन,किर्तन याकरता गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार ऑनलाईन दर्शन सुविधा करता येईल शक्यतो शाडूची मूर्ती असाववी आणि घरगुती मूर्ती शक्यतो घरीच विसर्जित करावी घराबाहेर करायचं असल्यास कृत्रिम विसर्जन हौदाचा वापर करावा जेष्ठ नागरिक, लहान मुलांनी विसर्जन घाटावर येणं टाळावे