JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Pune: पिंपरीत Wine Shop चालक आणि ग्राहकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, घटनेचा LIVE VIDEO

Pune: पिंपरीत Wine Shop चालक आणि ग्राहकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, घटनेचा LIVE VIDEO

LIVE video of free style fight in Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमधील एका वाईन शॉपमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे.

जाहिरात

पिंपरीत वाईन शॉप चालक आणि ग्राहकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पिंपरी, 21 ऑक्टोबर : वाईन शॉपमध्ये (Wine Shop) आलेल्या ग्राहकांमध्ये आणि वाईन शॉप चालकात झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाली आहे. पिंपरीतील (Pimpri) रिगल वाईन्स शॉपमध्ये झालेली फ्री स्टाईल हाणामारीची (Freestyle fight) घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली (Customer and wine shop owner free style fight caught in cctv) आहे. ग्राहकांनी वाईन शॉपमधील कर्मचाऱ्यांना मारहाण करत दुकानाचीही तोडफोड केली आहे. वाईन शॉप मालकाला दारुडे मारहाण करत असल्याची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. तर दारुडे दुकानाबाहेर तोडफोड करत असतानाची दृश्य रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहेत. पिंपरी - चिंचवड शहरातील अशोका थिएटर जवळील रिगल वाईन्समध्ये ही मारहाण आणि तोडफोडीची घटना काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

संबंधित बातम्या

700 रुपयांपेक्षा जास्त किमतीची दारू दुकानदाराला मागत असल्याने, झालेल्या वादात ही मारहाण आणि तोडफोड करण्यात आली आहे. दारुड्यांनी हातात लोखंडी पाइप घेऊन रिगल वाईन्सची तोडफोड केली आहे. या प्रकरणात कीर्ती लक्ष्मण राजपूत यांच्या तक्रारीवरून चारही दारुड्या विरोधात पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस मारहाण आणि तोडफोड करणाऱ्या दारुड्यांचा शोध घेत आहेत. वाचा : विवाहित बहिणीसोबत भावाचं विकृत कृत्य; नवरा घरी नसताना भेटायला आला अन्… येरवड्यात दोन दुकानांची तोडफोड येरवडा जयप्रकाश नगर येथे चार अल्पवयीन मुलांनी दोन दुकाने फोडली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. जयप्रकाश नगर येतील किराणा दुकाने दहशत माजविण्याच्या दृष्टीने फोडण्यात आली. यामध्ये नेमका किती ऐवज चोरीला गेला हे समजू शकले नाही. येरवडा भागात दहशत माजविण्याच्या दृष्टीने असेच अनेक छोटेमोठे प्रकार वारंवार घडत असतात. या घटनेमुळे पुन्हा एकदा येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा व सुववस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. किराणा दुकानदार दुकानात ग्राहकांना सामान देत असतानाच चार जण येऊन हॉकी स्टिकने दुकानातील सामान फोडत असल्याचं सीसीटीव्ही कैद झालं आहे. यापूर्वीही असे अनेक प्रकार येरवडा परिसरामध्ये झालेले आहेत. येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर आहे. अवैध धंदे व असले युवकांचे टोळके हे दहशत माजवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फोफावले आहेत. दहशत माजवणाऱ्या विरोधात येरवडा पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी वारंवार केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या