JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Pune Fire: पुण्यात फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग, अग्नितांडवाचा Live Video

Pune Fire: पुण्यात फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग, अग्नितांडवाचा Live Video

Pune Fire: पुण्यातल्या पिसोळी भागात ही आग लागली आहे. फर्निचर (Furniture) च्या गोडाऊनला ही आग लागली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 09 नोव्हेंबर: पुण्यात (Pune Fire) आग लागल्याची घटना घडली आहे. पुण्यातल्या पिसोळी भागात ही आग लागली आहे. फर्निचर (Furniture) च्या गोडाऊनला ही आग लागली. या आगीत गोडाऊन (Godown)जळून खाक झालं आहे. पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास दगडे वस्तीतल्या एक लाकडी सामानाच्या (फर्निचर) गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीचे व्हिडिओ आता समोर आले आहेत.

संबंधित बातम्या

आगीची माहिती मिळताच पुणे आणि PMRDA 14 अग्निशमन दलांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर तीन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. सध्या कुलिंगचे काम सुरु आहे. हेही वाचा-  दहशतवाद्यांचं टाग्रेट ठरताहेत सामान्य नागरिक, काश्मीरमध्ये आणखी एकाची गोळ्या झाडून हत्या सुदैवानं या आगीत कोणीतीही जीवितहानी झालेली नाही. जवळपास 24 हजार स्वेक्वअर फूट असलेलं गोडाऊन या आगीत खाक झालं आहे. गोडाऊनमधील फर्निचर आणि त्यासाठी लागणारं साहित्य जळून खाक झालं. दरम्यान ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या