प्रतिकात्मक फोटो
पुणे, 31 मार्च : मुलगा आणि मुलगी यांच्यात आजही काहीजण भेद करतात. एखाद्या महिलेनं मुलीला जन्म दिल्यास तिला दुय्यम वागणूक मिळते, हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, ऐकलं असेल. पण पुण्याचे एक डॉक्टर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मुलीचा जन्म झाल्यास, नवजात मुलीचा आणि तिच्या आईचा वेगळाच सन्मान करतात. हडपसरमध्ये या डॉक्टरांचे हॉस्पिटल असून, येथे प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला मुलगी झाली तर तिच्याकडून प्रसूतीचं बिल घेतलं जात नाही. या हॉस्पिटलमध्ये मुलीच्या जन्माचा आनंद साजरा केला जातो, केक कापला जातो, मिठाई वाटली जाते. गणेश राख असं मुलीच्या जन्माचं असं अनोख स्वागत करणाऱ्या या डॉक्टरांचं नाव आहे ‘नवभारत टाइम्स’ने याबाबत वृत्त दिलंय. काय आहे मिशन? डॉ. गणेश राख यांनी नवजात मुलींना वाचवण्यासाठी एक मिशन सुरू केलंय. गेल्या काही वर्षांत त्यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी आलेल्या ज्या महिलेनं मुलीला जन्म दिला, त्यांच्याकडून त्यांनी एक पैसाही घेतला नाही. उलट मुलगी जन्माला येताच हॉस्पिटलमध्ये जल्लोष करण्यात आला. केक कापून मोठ्या उत्साहात आनंद साजरा केला गेला. शेतकऱ्याच्या लेकीनं नाव काढलं! थेट ‘इस्रो’मध्ये झाली निवड पुण्यातील हडपसर येथे डॉ. गणेश राख यांचे हॉस्पिटल असून हे हॉस्पिटलमध्ये म्हणजे ‘बेटी बचाओ’चे एक उदाहरण आहे. कारण या हॉस्पिटलमध्ये गेल्या दशकभरात 2,400 हून अधिक मुलींचा जन्म झालाय. या उपक्रमाला त्यांनी ‘बेटी बचाओ जनआंदोलन’ असं नाव दिलंय. परदेशामध्येही दखल 2012 पासून स्त्री भ्रूण हत्येविरोधात मोहीम राबवत असलेल्या डॉ. गणेश राख यांच्या या मोहिमेत आता अनेकजण सहभागी होत आहेत. डॉ. राख यांच्या कार्याची दखल भारताबाहेरही घेतली गेली असून काही आफ्रिकन देशही त्यांच्या या उपक्रमात सामील झालेत. या उपक्रमामुळे आजूबाजूच्या परिसरात स्त्री भ्रूण हत्येविरोधात जनजागृती झालीय. या भागांमध्ये स्त्री भ्रूण हत्येच्या घटनांमध्ये घट झालीय. डॉ गणेश यांनी 2012 मध्ये ‘बेटी बचाओ’ उपक्रम सुरू केला. त्याची सुरुवात त्यांनी एका विशिष्ट प्रकारची जाणीव झाल्यानंतर केली. तेव्हा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या महिलेनं मुलीला जन्म दिला की, त्या महिलेल्या घरातील सदस्यांचे चेहरे निराश दिसायचे. मुलीच्या जन्मामुळे अनेकजण नाराज व्हायचे. बऱ्याचदा तर नवजात मुलगी व आई यांना कोणी भेटायला येत नव्हते. अनेकजण तर मुलीच्या जन्मानंतर हॉस्पिटलची फी भरण्यास नकार द्यायचे. या गोष्टींनी डॉ.गणेश खूप अस्वस्थ झाले. त्यानंतर त्यांनी ठरवलं की, आता हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी आलेल्या एखाद्या महिलेनं मुलीला जन्म दिल्यास त्यांना हॉस्पिटलचं फी घ्यायची नाही. तसेच मुलीच्या जन्माचा आनंद हॉस्पिटलमध्ये साजरा करायचा. आईला वाचवण्यासाठी मुलीचा रौद्रावतार, हल्ला करणाऱ्या कोल्ह्याचा आवळला गळा, Video अनेकवेळा काहीजणांनी मुलीच्या जन्मानंतरही डॉक्टरांना पैसे घेण्याची विनंती केली. पण त्यांनी ते स्वीकारले नाहीत. डॉ.गणेश यांनाही एक मुलगी आहे. आता ते त्यांच्या हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या प्रत्येक मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करतात. आई-मुलगी जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये आहे, तोपर्यंत त्यांची पूर्ण काळजी घेतली जाते. त्यांच्या खर्चही हॉस्पिटल करते. विशेष म्हणजे आता पालकांनाही मुलीच्या जन्माचा अभिमान वाटू लागला आहे.