JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पुण्यात रुग्ण घटले पण धोका टळला नाही! अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत हाच जिल्हा टॉपवर

पुण्यात रुग्ण घटले पण धोका टळला नाही! अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत हाच जिल्हा टॉपवर

रुग्णसंख्या घटली म्हणजे पुणेकरांना कोरोनापासून मोकळा श्वास मिळाला असं मुळीच नाही.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 14 जुलै :  कोरोनाच्या पहिल्या लाटेने (Coronvirus in Pune) सर्वाधिक कहर केला तो पुण्यात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटकाही पुण्याला (Pune coronavirus cases) बसला. पहिल्या लाटेच्या तुलनेत पुण्यात आता बऱ्यापैकी कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. पण रुग्ण संख्या घटली म्हणून पुण्यावरील कोरोनाचा धोका टळला असं मुळीच नाही. अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या बाबतीत पुणे (Pune corona active cases) अद्याप टॉपवर आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने 14 जुलै रोजी राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती जारी केली आहे. या रिपोर्टमधील आकडेवारीनुसार पुण्यात पहिल्या लाटेत सर्वाधिक 82172 सक्रीय रुग्णांची नोंद झाली होती. 13 जुलै 2021 च्या आकडेवारीनुसार आता पुण्यात फक्त 16663 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. याचा अर्थ अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण 79.72 टक्क्यांनी कमी झाले आहेत. इतक्या प्रमाणात अॅक्टिव्ह रुग्ण कमी होऊनही सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या 10 जिल्ह्यात पुणे टॉपवर आहे. पुण्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची टक्केवारी सर्वात जास्त म्हणजे 16.38 टक्के आहे आणि हे चिंताजनक आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती पहिल्या दोन लाटांचं स्वरूप पाहता तिसरी लाट येणं अटळ असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. दुसऱी लाट ओसरल्यानंतर नागरिकांमध्ये ज्या प्रकारची बेफिकिरी दिसत आहे, ती चिंताजनक असून तिसऱ्या लाटेचं गांभिर्य वाढवणारी असल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशननं म्हटलं आहे. दरम्यान, हैद्राबाद विद्यापीठातील भौतिकशास्त्र तज्ज्ञांनी तिसरी लाट 4 जुलैपासून सुरू झाली असल्याचा दावा केला आहे. गेल्या काही दिवसात मृत्युंचा आकडा वाढला असून बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे या निष्कर्षावर आल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. राज्यात निर्बंध कायम राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देशाच्या तुलनेत कमी आहे. गेल्या 3 आठवड्यात रुग्ण संख्या स्थिर आहे. पण 10 जिल्ह्यांमध्ये 92 टक्के रुग्ण आहे. त्यामुळे लेव्हल 3 मध्ये अनेक जिल्हे आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यात कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाही. जे नियम सध्या लागून आहे ते तसेच राहणार आहे, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी जाहीर केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या