JOIN US
मराठी बातम्या / पुणे / सोशल मीडियात दहशत पसरवणारे 13 भाई गजाआड, पिंपरी चिंचवड पोलिसांची धडक कारवाई

सोशल मीडियात दहशत पसरवणारे 13 भाई गजाआड, पिंपरी चिंचवड पोलिसांची धडक कारवाई

सध्या समाज माध्यमांवर शस्त्रे घेऊन फोटो आणि व्हिडीओ टाकणाऱ्यांच प्रमाण वाढलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पिंपरी चिंचवड, 24 जुलै : फेसबूक, इन्स्टाग्राम सारख्या समाज माध्यमांवर (Social Media) आणि फ्लेक्स बाजी करत स्वतःचे धारदार शस्त्रांसोबतचे व्हिडीओ, फोटो टाकून दहशत निर्माण करणाऱ्या भाईंना दणका. पिंपरीतील (Pimpri) स्वयंम घोषित तब्बल 13 भाईंना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad Police) गुंडा विरोधी पथकाने (Goonda virodhi Pathak) अटक केली आहे. पिंपरी चिंचवड परिसरात अशा प्रकारे भाईगिरी करणा-यांची वाढती संख्या पोलिसांसाठी डोके दुःखी ठरू लागल्याने, दहशत पसरविणाऱ्या भाईंना पकडण्यासाठी धडक मोहीम राबविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आणि मागील 20 दिवसांपासून समाज माध्यमांवर नजर ठेऊन बसलेल्या गुंडा विरोधी पथकाने तब्बल 13 जणांना अटक केली आहे.

VIDEO: सेल्फी काढायला गेला अन् नदीत अडकला, मग झालं असं की…. विशेष म्हणजे अटक केलेल्यांमध्ये सर्वाधिक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींचा समावेश असून ते “रावण साम्राज्य” टोळीचे सदस्य असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अटक केलेल्या आरोपींकडून, बंदुका, जिवंत कडतुसांसह धारदार शस्त्रेही जप्त करण्यात आल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख हरीश माने यांनी दिली आहे.

रायगडमधील दरड कोसळतानाचा LIVE VIDEO सध्या समाज माध्यमांवर शस्त्रे घेऊन फोटो आणि व्हिडीओ टाकणाऱ्यांच प्रमाण वाढलं आहे. अनेकांना हा प्रकार केवळ मौज वाटत असेल मात्र कायद्याने अस करण्याला बंदी आहे. एव्हढच काय तर शस्त्राने केक कापणे, दहशत निर्माण होईल असं कृत्य दाखवणे आणि दोन समाजात तेढ निर्माण होईल असं बोलण्यावर सुद्धा कायद्याने बंदी आहे. त्यामुळं कायद्याने घालून दिलेले  नियम आपल्यासह सर्वांना लागू आहेत आणि म्हणून सोशल मीडियाचा वापर जपून करा असे अवाहन पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केलं आहे

अनिरुद्ध उर्फ विकी उर्फ बाला जाधव, दिपक जैसवाल, रोहन कांबळे, अमित मल्लाह, मंगेश नाटेकर, अक्षय चौगुले असं अटक केलेल्या मुख्य आरोपींची नावे आहेत.

 हे आरोपी बालाजी नगर, रावेत परिसरातील रहिवासी असून ह्या सर्वांच्या विरोधात  पुणे, देहुरोड, चिंचवड पोलीस स्टेशन अंतर्गत गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने गुंडा विरोधी पथकाने केलेली कारवाई महत्वाची मानली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या