JOIN US
मराठी बातम्या / पुणे / मालकाने दिला नाही पगार, नोकराने दुचाकी पळवली अन् चौकात जाळली, पुण्यातला VIDEO

मालकाने दिला नाही पगार, नोकराने दुचाकी पळवली अन् चौकात जाळली, पुण्यातला VIDEO

महिनाभर काम केल्यानंतरही पगार न मिळाल्यामुळे अंकितला राग अनावर झाला. त्याने थेट मालकाची दुचाकीच पळवून आणली.

जाहिरात

महिनाभर काम केल्यानंतरही पगार न मिळाल्यामुळे अंकितला राग अनावर झाला. त्याने थेट मालकाची दुचाकीच पळवून आणली.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पिंपरी चिंचवड, 03 सप्टेंबर : कोरोनामुळे (corona) अनेक उद्योग धंद्यांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे कामगारांच्या पगाराचेही वांदे झाले होते. पण आता कोरोनातून सावरल्यानंतर उद्योग धंदे सुरू झाले आहे पण अजूनही मालकांकडून पैसे काही निघत नाही. त्यामुळेच पिंपरी चिंचवडमध्ये ( Pimpri Chinchwad ) एका कामगाराने पगार न दिल्यामुळे मालकाची दुचाकीच भर रस्त्यावर पेटवून दिली. (bike was burnt inPimpri Chinchwad) मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात ही घटना घडली आहे.  अंकित शिशुपाल यादव असं दुचाकी पेटवून देणाऱ्या कामगाराचं नाव आहे. अंकित यादव हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून तो मांजरी येथे गणेश उंदरे पाटील यांच्याकडे कामाला होता.

मात्र गणेश पाटील यांनी अंकित यादव याला पगार दिला नाही. त्याने पाटील यांच्याकडे पगाराची मागणी केली. पण, त्यांनी काही पगार दिलाच नाही. महिनाभर काम केल्यानंतरही पगार न मिळाल्यामुळे अंकितला राग अनावर झाला. त्याने थेट मालकाची दुचाकीच पळवून आणली.  त्यानंतर  गाडी चिंचवड येथील प्रदीप स्वीटच्या समोर पेटवून दिली आहे. ‘जेवढे पैसे काढता येतील काढा’, शेतकऱ्यांकडून विमा एजंटची वसुली, बीडमधला VIDEO भर रस्त्यावर दुचाकी पेटवण्याची घटना शहरात वाऱ्यासारखी पसरली. स्थानिकांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेऊन दुचाकीला लागलेली आग विझवली. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अंकित यादव याला  अटक केली आहे. याआधीही पिंपरी चिंचवडमध्ये अशीच एक घटना घडली होती. 18 ऑगस्टला एका चालकाला कामावरून काढले होते. त्यामुळे त्याने मालकाच्या 22 लाखांच्या गाड्या जाळल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या