JOIN US
मराठी बातम्या / पुणे / मस्करी बेतली जीवावर : पिंपरी-चिंचवडमध्ये 7 जणांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू

मस्करी बेतली जीवावर : पिंपरी-चिंचवडमध्ये 7 जणांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू

पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad) सात जणांनी केलेल्या जबर मारहाणीत (beating) एकाचा मृत्यू (Death) झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 10 ऑगस्ट : पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad) सात जणांनी केलेल्या जबर मारहाणीत (beating) एकाचा मृत्यू (Death) झाला आहे. हत्या झालेल्या इसमानं इतरांची मस्करी करण्यावरून (Teasing) हे भांडण सुरू झाल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे. मात्र साध्या थट्टा मस्करीवरून सुरु झालेल्या या वादाचं पर्यवसान हत्येत झालं. अशी घडली घटना पिंपरी चिंचवडच्या डिलक्स चौकात हत्या झालेल्या युवकाचं नाव राजू कासबे असं आहे. राजूनं या चौकात उभ्या असणाऱ्या एका व्यकतीला चिडवत होता. त्यानंतर त्यानं काठी घेऊन हल्लादेखील केला. त्यानंतर ज्याच्यावर त्यानं हल्ला केला, त्याच्यासाठी सात जण जमा झाले आणि त्यांनी राजूला घेरलं. राजूवर लाथा, बुक्क्या आणि दांडक्यांनी जोरदार प्रहार करण्यात आले, अशी बातमी ‘ दैनिक भास्कर ’ने दिली आहे. यात काही वार वर्मी लागल्यमुळे राजू गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. सात जणांविरोधात गुन्हा विशेष म्हणजे पिंपरी-चिंचवडमध्ये भर चौकात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीची मस्करी करण्याच्या साध्या गोष्टीवरून सुरु झालेल्या वादातून थेट एका तरुणाची हत्या झाल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. 2021 मध्ये जानेवारी ते जून 2021 या सहा महिन्यांमध्ये 139 जणांवर खुनी हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी या कालावधीतील आकडा 44 इतका होता, अशी बातमी ‘दैनिक भास्कर’नं दिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा 95 ने वाढला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या