JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पुणे: येरवडा कारागृहातून पत्नीला पाठवल्या 33 चिठ्ठ्या; गुन्हेगारी टोळी ठेवली सक्रिय अन्...

पुणे: येरवडा कारागृहातून पत्नीला पाठवल्या 33 चिठ्ठ्या; गुन्हेगारी टोळी ठेवली सक्रिय अन्...

Crime in Pune: आरोपीनं तुरुंगातून आपल्या पत्नीला तब्बल 33 चिठ्ठ्या पाठवल्या (Accused sent 33 letters to wife from jail) आहेत. तसेच कारागृहात बेकायदेशीरपणे मोबाइल फोनचा वापर करत आपल्या पत्नीला मेसेज पाठवून टोळीकडून विविध गुन्हे करवून घेतले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 24 सप्टेंबर: एका गंभीर गुन्ह्यात पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने तुरुंगात राहून आपली टोळी सक्रिय ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं तुरुंगातून आपल्या पत्नीला तब्बल 33 चिठ्ठ्या पाठवल्या (Accused sent 33 letters to wife from jail) आहेत. तसेच कारागृहात बेकायदेशीरपणे मोबाइल फोनचा वापर करत आपल्या पत्नीला मेसेज पाठवून टोळीकडून विविध गुन्हे करवून घेतल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. सागर राजपूत असं संबंधित आरोपीचं नाव असून मागील काही दिवसांपासून तो पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. एका सदनिकेच्या व्यवहारासाठी सात लाख रुपये दिल्यानंतर, आरोपीने फिर्यादीकडून 25 लाख रुपये वसूल करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी केली होती. पण कारागृहात गेल्यानंतरही त्याने आपली गुन्हेगारी सुरूच ठेवल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. हेही वाचा- मुंबई: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून झाला फरार; हनीट्रॅपचा वापर करत नराधमाला अटक आरोपी सागर राजपूत याची बहिण राणी सागर मारणे ही पत्नी जिग्नेशा हिच्या मोबाईलवरून आरोपी सागर राजपूतच्या संपर्कात होती. आरोपीने पत्नीच्या नावे वेळोवेळी पाठवलेल्या चिठ्ठ्यांद्वारे बहिणीने गुन्हेगारी टोळी चालवून आरोपीला मदत केली आहे. तुरुंगातील आरोपीचे निरोप बाहेरील लोकांना देणं, धमकावणे, भेटीगाठी घेणे, चिठ्ठ्यांतील निरोप देणे व घेणे, संबंधितांना पैसे पुरवणे अशी सर्व कामे आरोपीच्या बहिणीने केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. आरोपीची बहिणी राणीचा या गुन्ह्यांत पूर्णपणे सक्रिय सहभाग असल्याचं तपासात उघड झालं आहे. या घटनेचा  पुढील तपास पोलीस करत करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या