JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Corona च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका, पुणे मनपाने खाजगी रुग्णालयांना पत्र पाठवून दिल्या 'या' सूचना

Corona च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका, पुणे मनपाने खाजगी रुग्णालयांना पत्र पाठवून दिल्या 'या' सूचना

Pune Municipal Corporation letter to Private hospital over covid 3rd wave: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता पुणे मनपाने रुग्णालयांना काही सूचना केल्या आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 1 सप्टेंबर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या (Coronavirus third wave) पार्श्‍वभूमीवर कधीही बेड ताब्यात घेणार, त्यामुळे तयारीत रहा अशा आशयाचे पत्र पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आरोग्य विभागाने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना पाठवले आहे. महापालिकेने करोनाच्या यापूर्वीच्या दोन लाटांमध्ये सुमारे 80 टक्के बेड खासगी रुग्णालयांकडून ताब्यात घेतले होते. या पार्श्वभूमीवरआताही पालिकेने 50 टक्के बेड्स कोरोनासाठी राखीव ठेवण्याची तयारी ठेवलीय. यापैकी 10 टक्के बेड्स हे लहान मुलांसाठी ठेवावेत, अशाही सूचना दिल्या आहेत. आपल्या पत्रात मनपाने म्हटलं आहे, कोविड 19 साथरोगाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत आढळून येणाऱ्या कोविड रुग्णांच्या उपचारासाठी आपले रुग्णालयात रुग्ण दाखल करण्यास तसेच उपचारासाठी नकार न देता रुग्णालयात तातडीने दाखल करुन घेण्यात यावे. जेणेकरुन कोरोना बाधित रुग्णांना बेड्स अभावी उपचार मिळण्यास विलंब होणार नाही. रुग्णांना वेळेत उपचार मिळतील याबाबत काटेकोर दक्षता घेण्यात यावी. रुग्णांवरील उपचार आणि त्यांच्या बिलाच्या आकारणी संदर्भात तक्रारी उद्भवणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच कोविड 19च्या तिसऱ्या लाटेचा वर्तवलेला अंदाज लक्षात घेता पुढील काळात विभागीय आयुक्त पुणे यांनी यापूर्वी उपलब्ध करुन दिलेल्या डॅशबोर्डवर बेड्स उपलब्धतेबाबत माहिती सतत अद्ययावत ठेवण्यात यावी असंही पत्रात म्हटलं आहे. अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्याची 6 कोटींची फसवणूक टास्क फोर्सची ऑनलाईन वैद्यकीय परिषद कोविडच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन अनेकविध उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोविड राज्य कृती दलाने रविवार 5 सप्टेंबर रोजी ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिषदेत सहभागी होणार, असून त्यांच्या संबोधनाने परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख उपस्थित राहणार आहेत. रविवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत होणारी परिषद समाज माध्यमांवरून प्रसारित केली जाणार आहे. राज्यातील सर्व फॅमिली डॉक्टर्स, वैद्यकीय तज्ञ तसेच नागरिकांनाही परिषदेस ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहता येणार आहे. या परिषदेतील चर्चेमुळे कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने शंका तसेच घ्यावयाची काळजी अशा विविध बाबींची माहिती घेता येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या