प्रातिनिधीक फोटो
पुणे, 13 नोव्हेंबर: अमेरिकेतील एका तरुणाने लग्नापूर्वी प्रेयसीसोबत ठेवलेल्या शारीरिक संबंधाचा व्हिडीओ तिच्या पतीला पाठवल्याची एक विचित्र घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं पुणे पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे. संबंधित प्रकरण अमरावती जिल्ह्यात घडल्यामुळे पुणे पोलिसांनी हे प्रकरण फ्रेजरपुरा पोलिसांकडे वर्ग केलं आहे. आरोपीनं फिर्यादी महिलेच्या पतीच्या ईमेल पत्त्यावर हा व्हिडीओ पाठवून तरुणीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस करत आहेत. राज ज्ञानेश्वर धोंडे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणाचं नाव असून तो मूळचा अमरावती जिल्ह्यातील रहिवासी आहे. पण सध्या तो अमेरिकेत नोकरीनिमित्त गेला आहे. महिलेच्या तक्रारीनुसार, 2014 साली पीडित महिला अमरावती याठिकाणी बारावीचं शिक्षण घेत होती. यावेळी तिची ओळख राज धोंडे नावाच्या तरुणाशी झाली. यानंतर ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं आणि दोघंही एकमेकांवर प्रेम करू लागले. दरम्यान आरोपी तरुणी नोकरीनिमित्त आपल्या वडिलांसोबत अमेरिकेला गेला. हेही वाचा- पोलिसांत तक्रार दिल्याचा घेतला विचित्र बदला; पीडितेच्या घरात घुसून विकृत कृत्य 2015 मध्ये अमेरिकेहून परत आल्यानंतर, आरोपी राज पीडितेला अमरावती याठिकाणी येऊन भेटला. यावेळी त्याने फिर्यादीकडे लग्नासाठी मागणी घातली. पण आरोपीच्या हट्टी स्वाभावामुळे पीडितेनं त्याला लग्नासाठी नकार दिला. पण दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरूच होते. यावेळी आरोपीनं पीडितेला अमरावती जिल्ह्यातील फ्रेजरपुरा येथील एका भाड्याच्या खोलीत नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान आरोपीनं पीडितेच्या नकळत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. काही दिवसांनंतर दोघांचा ब्रेकअप झाला आणि आरोपी पुन्हा अमेरिकेला निघून गेला. हेही वाचा- बीड हादरलं! अल्पवयीन मुलीवर 400 जणांकडून बलात्कार, पोलिसानंही केलं लैंगिक शोषण पण 2016 मध्ये आरोपी राजनं फेसबुकवर फेक अकाऊंट काढून तरुणीच्या बहिणीला तिचे अश्लील फोटो पाठवले. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने 2 जुलै 2021 रोजी फेसबुकवरून तरुणीचं फेक अकाऊंट काढून तिच्या नातवाईकांना आणि मित्रांना शारीरिक संबधाचे फोटो पाठवत बदनामी केली. त्यामुळे पीडित तरुणीने पुणे शहरातील सायबर पोलिसात तक्रार दिली. पण तक्रार दाखल होण्यापूर्वी आरोपीनं फेक अकाऊंट डिलीट केल्यामुळे त्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. पण त्यानंतर आरोपीनं फिर्यादी महिलेच्या पतीच्या ईमेल अकाऊंटवर शरीर संबंधाचा व्हिडीओ पाठवला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.