JOIN US
मराठी बातम्या / पुणे / आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं पुण्यात निधन, 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं पुण्यात निधन, 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

योग आणि आयुर्वेद (Yoga and Ayurveda) या क्षेत्रातील भरीव कार्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या डॉ. बालाजी तांबे (Dr. Balaji Tambe dies) यांचं पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झालं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 10 ऑगस्ट : योग आणि आयुर्वेद (Yoga and Ayurveda) या क्षेत्रातील भरीव कार्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे (Dr. Balaji Tambe passes away) यांचं पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झालं. वयाच्या 81 व्या वर्षी (81 years) मंगळवारी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या आठवड्यात तांबे यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावत गेली. ते उपचाराला प्रतिसाद देईनासे झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. योग आणि आयुर्वेद यांची सांगड घालत सामाजिक परिवर्तनासाठी गेली कित्येक वर्षं ते कार्यरत होते. विविध वृत्तपत्र, मासिकं आणि इतर माध्यमांतून या विषयातलं प्रबोधन करत असत. आतापर्यंत त्यांनी या विषयांवर शेकडो लेख लिहिले. आयुर्वैदाबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचं मोठं कार्य त्यांनी गेली अनेक वर्षं केलं. आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीत यांची सांगड घालून आयुष्य अधिक आरोग्यपूर्ण बनवता येऊ शकतं, हा संदेश ते गेली 5 दशकं देत राहिले. शास्त्रोक्त आणि गुणवत्तापूर्ण आयुर्वैदिक औषधांच्या निर्मितीतही त्यांचं योगदान मोलाचं मानलं जातं. आयुर्वैदाचा त्यांनी भारतासह भारताबाहेरही प्रचार आणि प्रसार केला. आपल्या ओघवत्या वक्तृत्व शैलीचा उपयोग करून त्यांनी आयुर्वेदाची महती जगातील अनेक देशांमध्ये पोहोचवण्यात यश मिळवलं. हे वाचा - गोल्ड विनर नीरज चोप्राच्या वेट लॉस जर्नीने इम्प्रेस झाला अर्जुन कपूर तांबे यांच्या गर्भसंस्कार (Garbhasankar) या पुस्तकाचंही काही वर्षांपूर्वी प्रकाशन झालं होतं. इंग्रजीसह सहा भाषांमध्ये या पुस्तकाचा अनुवाद झाला होता. त्याच्या लाखो प्रति विकत घेत नागरिकांनी त्यांच्या पुस्तकावर प्रेमाची उधळण केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या