JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पुण्यातील मॉल बंद का? अजित पवारांनी सांगितलं निर्बंधांमागचं कारण

पुण्यातील मॉल बंद का? अजित पवारांनी सांगितलं निर्बंधांमागचं कारण

पुण्यातील मॉल बंद ठेवण्यामागे एक शास्त्रीय कारण असल्याचं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यामुळेच मॉल बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 2 जुलै: पुण्यामध्ये (Pune) मॉल सुरु करण्याचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारनं तीनच आठवड्यात घुमजाव करत मॉल (Mall) आणि थिएटर्स (Theaters) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मॉलमध्ये सेंट्रलाईज एसी (Centralized Air Conditioner) असतो. त्यामुळे एका भागातील हवा दुसऱ्या भागात जात असते. यामुळे कोरोनाचा संसर्ग (Corona) वाढायला हातभार लागू शकतो, असं तज्ज्ञांनी सांगितल्यामुळेच मॉल बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मॉल आणि इतर दुकानांमध्ये फरक इतर दुकानं उघडी ठेवण्याच्या निर्णयाची तुलना मॉलशी करता येणार ऩसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. इतर दुकानांमध्ये नागरिक कामापुरते जातात आणि हवी ती वस्तू घेऊन लगेच बाहेर पडतात. मात्र मॉलच्या बाबतीत असं होत नाही. हवी ती वस्तू घेतल्यानंतरही नागरिक लगेच मॉलमधून बाहेर पडत नाहीत. त्यांची पावलं मॉलमध्येच इतरत्र फिरत राहतात, असं ते म्हणाले. अनेकजण तर काहीही खरेदी करायची नसताना, केवळ फिऱण्यासाठी किंवा वेळ घालवण्यासाठी मॉलमध्ये येतात आणि त्यामुळे विनाकारण गर्दी होण्याची शक्यता असून कोरोना संसर्ग वाढेल, अशा कुठल्याही शक्यतेला स्थान मिळणार नाही, याची दक्षता प्रशासन घेत असल्याचं पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. पुण्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय पुण्यात गेल्या काही आठवड्यांपासून कमी झालेली कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा वाढू लागल्याचं सांगत त्यासाठी उपाययोजना सुरु असल्याचं अजित पवार म्हणाले. पुण्याचा पॉझिटीव्हीटी दरही वाढत असून तो 4.6 टक्क्यांवरून 5.3 टक्के झाल्याचं त्यांनी सांगितलं. हे वाचा - अनिल देशमुखांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ईडीच्या रडारवर? आहे तीच नियमावली सुरू राहणार पुण्यातील मॉल आणि थिएटर्स बंदच राहणार असून इतर व्यवहारदेखील पूर्वीसारखेच आणि पूर्वीएवढाच वेळ सुरू राहणार असल्याची घोषणा त्यांनी केली. पुण्यातील पॉझिटीव्हीटी दर वाढत असताना कुठलाही दिलासा देणं किंवा बाजारपेठेची वेळ वाढवणं शक्य नसल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. सध्या सुरु असलेल्या निर्बंधांप्रमाणेच पुण्यातील व्यवहार पुढील आठवड्यातदेखील सुरू राहणार असल्याचं त्यामुळं स्पष्ट झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या