JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पुणेकरांना अजित पवारांनी दिली मोठी GOOD NEWS

पुणेकरांना अजित पवारांनी दिली मोठी GOOD NEWS

पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 4 जून: पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड **(Pimpri Chinchwad)**मधील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येला ब्रेक लागला असून रिकव्हरी रेटही वाढला (Recovery rate increased) आहे. पुणे शहराचा रिकव्हरी रेट संपूर्ण देशात सर्वाधिक आहे. यामुळेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ब्रेक द चेन अंतर्गत लागू असलेले निर्बंध आणखी शिथिल (restrictions will be relaxed) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. आढावा बैठकीनंतर अजित पवार म्हणाले, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मध्ये संसर्ग प्रमाण 5 टक्के खाली आहे. सोमवारपासून पुणे,पिंपरी चिंचवड मध्ये आणखी शिथिलता देण्यात येईल. मात्र ग्रामीण भागात 12 टक्के संसर्ग प्रमाण आहे. म्युकर मायकोसिस वरील इंजेक्शनची अजूनही कमतरता आहे. "…तेव्हापासून मी सारखा झोपेतून जागा होतो आणि TV लावून पाहतो सरकार आहे की पडलं" या भागांत शिथिलता देणार नाही अजित पवार पुढे म्हणाले की, पुण्यातील खडकी तसंच पुणे कॅन्टोन्मेंट परिसरामध्ये निर्बंध शिथिल होतील. मात्र देहू रोड कॅन्टोनमेंटमध्ये शिथिलता देता येणार नाही. या परिसरात रुग्णसंख्या अधिक असल्याने शिथिलता देता येणार नाहीये. पुण्यातील कोरोनाची स्थिती पुणे शहरात आज एकूण 7871 चाचण्या करण्यात आल्या. यापैकी आज 349 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 699 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज पुण्यात 21 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 5 हजारांच्या आत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या