ऐमरलँड ग्रिन पीट वायपर हा साप पहिल्यांदा 2002 मध्ये बर्माच्या इस्टर्न हिमालयावर पाहिला गेला. जो खूपच आकर्षक आहे.
ब्लू मलेशियन कोरल साप हा साप रेडियम असल्यासारखा दिसतो. त्यांची लांब पाच फूटापर्यंत वाढू शकते.
ब्राझेलियन रेनबो बोआ या सापाच्या कातडीला चकाकी आहे. जो उजेडात इंद्रधनुषाच्या रंगाचा दिसतो आणि हेच या सापाचं सौंदर्य आहे.
नॉर्दन स्कॅलेट स्नेक हा साप इस्टर्न आणि साउथर्न युनायटेड स्टेटमध्ये आढळतो, जो खूपच सुंदर आहे.
किंग कोब्रा या सापाच्या नावाने अनेकांना भिती वाटत असली तरी देखील त्याला जवळून पाहिलं तर तो खूपच आकर्षक आहे.
टोपाझ तानामी वोमा पायथन हा साप तानामी वाळवंटात आढतो, हे नॉर्दन ऑस्ट्रेलियामध्ये आहे. हा साप खूपच सुंदर आहे. पण त्याचं तोंड इतर सापांप्रमाणे नाही.
ल्यूसीस्टीक टेक्सास रॅट स्नेक सफेद रंगाचा हा साप फारच दुर्मीळ आहे. यासापात विष नाही.