अनेकदा रिलेशनशिपची विचित्र प्रकरणं समोर येतात. सध्या ब्रिटनमधील एका महिलेने सोशल मीडियावर नुकताच एक खळबळजनक खुलासा केला आहे.
तिने सांगितलं की पती आणि तिची आई 22 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते आणि तिच्या पतीने किंवा आईने याबद्दल तिला सांगितलंही नाही.
खरं तर, ब्रिटीश मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका 40 वर्षीय महिलेने तिची कहाणी सांगितली आणि सांगितलं की तिची इतकी फसवणूक झाली की तिला आयुष्यभर पश्चात्ताप होईल.
कारण ना तिच्या पतीने याबद्दल तिला काही सांगितलं ना तिच्या आईने. तिला आधी याबद्दल कळलं असतं तर नक्कीच काहीतरी निर्णय घेतला असता. मात्र तिला अंधारात ठेवण्यात आलं.
या नात्यातून मुलंही जन्माला आल्याचं या महिलेनं सांगितलं आणि तरीही तिला काहीही सांगण्यात आलं नाही. महिलेनं सांगितलं की तिने तिच्या प्रियकराशी लग्न केलं होतं आणि वयाच्या 18 व्या वर्षी ती तिच्या पतीसोबत शिफ्ट झाली होती.
मात्र, इकडे तिचा नवरा तिच्याच आईला भेटायला जायचा आणि तिला सुगावाही लागला नाही. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासाही अतिशय अजब पद्धतीने झाला. महिलेने सांगितलं की ती नुकतीच सहलीला गेली होती आणि तिथून परत आल्यावर ती थेट आईच्या घरी गेली. तिला तिचा नवरा तिथे दिसला आणि दोघेही आक्षेपार्ह स्थितीत होते.
यानंतर हळूहळू संपूर्ण प्रकरण उघड झालं. आता हे प्रकरण समोर आल्यानंतर ती महिला पूर्णपणे तुटली आणि पतीपासून तसंच आईपासून विभक्त झाली आहे. ती आपल्या मुलांसोबत राहत आहे.