शेवटी याचं कारण काय? कांदा कापल्याबरोबर डोळ्यातून पाणी का येतं आणि जळजळ का होते?
तज्ज्ञांच्या मते, कांदा कापताना डोळ्यातून अश्रू येण्यास एक रसायन कारणीभूत आहे. कांद्यामध्ये सायन-प्रोपॅनिथियल-एस-ऑक्साइड नावाचं रसायन आढळतं. या रसायनामुळे डोळ्यात पाणी येतं.
कांदा कापल्याबरोबर त्यामध्ये असलेले लॅक्राइमॅटरी-फॅक्टर सिंथेस एन्झाइम बाहेर पडतं, ज्यामुळे डोळ्यांच्या अश्रू ग्रंथीवर परिणाम होऊ लागतो आणि डोळ्यातून पाणी येऊ लागतं.
एका मीडिया रिपोर्टमध्ये संशोधनाचा हवाला देत असं म्हटलं आहे की, syn-Propanethial-S-oxide डोळ्यांच्या अश्रू ग्रंथींवर परिणाम करतं. त्यामुळे अश्रू येऊ लागतात.
आपण कांदा कापतो तेव्हा लॅक्रिइमेटरी-फॅक्टर सिंथेस एन्झाइम हवेत मिसळतं. यानंतर, हे एन्झाइम सल्फेनिक ऍसिडमध्ये बदलतं, ज्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ होते आणि अश्रू येऊ लागतात.
कांदा कापताना डोळ्यांतून अश्रू येत असले तरी कांदे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.
कांद्यामध्ये ए, बी6, सी आणि ई जीवनसत्त्वं आणि सोडियम, पोटॅशियम, लोह तसंच आहारातील फायबर यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक चांगल्या प्रमाणात आढळतात. कांद्यापासून फॉलिक अॅसिडही मिळतं.