शिक्षक लाल पेनाने का लिहितात किंवा विद्यार्थी निळ्या-काळ्या रंगाने का लिहितात यामागे कोणतंही निश्चित आणि लिखित कारण नाही. याबाबत अनेक अंदाज बांधले जातात आणि इथेही आम्ही जी माहिती देत आहोत ती वेगवेगळ्या अहवालांवर आधारित आहे.
विद्यार्थी निळ्या आणि काळ्या रंगात लिहितात कारण तो गडद रंग आहे आणि पांढऱ्या रंगाच्या कागदामुळे तो कॉन्ट्रास्ट राहतो. त्यामुळे लिखित गोष्टी सहज दिसतात.
शिक्षक लाल रंगाच्या पेनने लिहितात कारण त्यांना विद्यार्थ्यांचं लेखन तपासावं लागतं. यामुळे त्यांनी निळा किंवा काळा रंग वापरला तर त्यांचे शेरे विद्यार्थ्यांच्या उत्तरात मिसळतील आणि हे ओळखणं कठीण होईल की शिक्षकांनी काय लिहिलं आहे आणि कोणतं विद्यार्थ्यांचं आहे.
लाल रंगाव्यतिरिक्त कोणताही रंग निवडला जात नाही कारण लाल रंग अथॉरिटीचा वाटतो, त्या रंगात लिहिलेली गोष्ट महत्त्वाचे संदेश देते. त्यामुळे मुले तसेच त्यांचे कुटुंबातील सदस्य शिक्षकांनी लिहिलेल्या गोष्टी गांभीर्याने घेतात.
सोशल सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका पेपरमध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक रिचर्ड ड्यूक म्हणाले की, शिक्षक वापरत असलेल्या लाल रंगाचा विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम होतो.
लाल रंगाचा विद्यार्थ्यांच्या भावनांवर परिणाम होतो, त्यामुळे अमेरिकेत कोणत्याही प्रकारची सूचना किंवा कमतरता असल्यास लिहिण्यासाठी निळा रंग वापरण्याचा सल्ला दिला जात आहे.
तिथे लाल रंग वापरण्यापासून शिक्षकांना रोखलं जात आहे. प्राचीन कोरियन मान्यतेनुसार, जर एखाद्याचं नाव लाल रंगात लिहिलं तर त्याचा मृत्यू होतो. गोन टू कोरिया वेबसाइटनुसार, तेथील शिक्षक लाल रंगाचे पेन वापरत नाहीत.